शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

शेतक-यांना सक्षमपणे उभे करण्यासाठी कर्जमाफी - पालकमंत्री मदन येरावार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 5:51 PM

जून महिन्यात राज्य शासनाने केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजे कर्जमाफीची घोषणा दिवाळीपूर्वी प्रत्यक्षात अंमलात आणली. शासनाने दिलेला शब्द पाळला असून पारदर्शकपणे आणि ऑनलाइन पद्धतीने केलेली ही ऐतिहासिक कर्जमाफी आहे.

यवतमाळ : जून महिन्यात राज्य शासनाने केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजे कर्जमाफीची घोषणा दिवाळीपूर्वी प्रत्यक्षात अंमलात आणली. शासनाने दिलेला शब्द पाळला असून पारदर्शकपणे आणि ऑनलाइन पद्धतीने केलेली ही ऐतिहासिक कर्जमाफी आहे. हे सरकार शेतक-यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. अडचणीतील शेतक-यांना सक्षमपणे उभे करण्यासाठी ही कर्जमाफी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जिल्ह्यातील शेतक-यांना कर्जमाफी अंतर्गत कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रम आणि पात्र कुटुंबाचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. मंचावर वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री डॉ. अशोक उईके, राजेंद्र नजरधणे, संजीवकुमार रेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, संजय जोशी आदी उपस्थित होते.ऐतिहासिक कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानून पालकमंत्री येरावार म्हणाले, कर्जमाफीची रितसर सुरुवात आजपासून प्रत्येक जिल्हास्तरावर झाली आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतक-याच्या मागे शासन सदैव उभे आहे. कृषी वाहिन्या, जलयुक्त शिवार, शेततळे, मार्केट लिंकेज आदी योजना सरकारने आणल्या आहेत. एकही शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही. या योजनेचे अनेक वैशिष्टे आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकेच्या 1 लक्ष 48 हजार 765 आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 1 लक्ष 68 हजार 962 शेतकरी असे एकूण 3 लक्ष 42 हजार 200 शेतक-यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यात बीड नंतर यवतमाळ येथील कर्जमाफी मिळणा-या शेतक-यांची संख्या सर्वात जास्त आहे. सद्यस्थितील दिवाळीनिमित्त काही दिवसांच्या सुट्टया आल्या असल्या तरी कर्जमाफीची ही प्रक्रिया नियमित सुरु राहील. शासन, प्रशासन प्रत्येक शेतक-यांपर्यंत पोहचेल. शेतक-यांच्या खात्यात 15 नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.यावेळी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी म्हणाले, ही संपूर्ण आणि सरसकट कर्जमाफी आहे. या कर्जमाफीत प्रत्येक अडचणीत असलेल्या शेतक-यांचा समावेश झाला आहे. शासनाने शेतक-यांचा सातबारा कोरा केला आहे. या कर्जमाफीमुळे समोरच्या हंगामात बँकांची दारे शेतक-यांसाठी उघडी झाली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, शेतक-यांना मिळालेली कर्जमाफी ही दिवाळीच्या आनंदात दुग्धशर्करा योग आहे. तांत्रिक अडचणीवर मात करून जिल्हा प्रशासनाने सर्व लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी केली. यासाठी पालकमंत्र्यांचे मोठे सहकार्य लाभले. सहकार विभाग, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, महसूल यंत्रणा आदी शासकीय यंत्रणांनी या कामासाठी चांगली मेहनत घेतली, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले. यावेळी इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुबारकपूर (ता.बाभुळगाव) येथील किरण गोडे, नांदसावंगी (ता.बाभुळगाव) येथील गोविंद भटकर, मुकुटबन (ता.झरीजामणी) येथील मनोहर देवाडकर, रमेश माडीकुन्टवार (सत्तापल्ली, ता. झरीजामणी), कैलास ताकसांडे (वाटखेड, ता. राळेगाव), अनंता मानकर (वाटखेड, ता. राळेगाव) यांच्यासह एकूण 29 शेतक-यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र, साडीचोळी, टॉवेल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या या 29 शेतक-यांची कर्जमाफीची एकूण रक्कम 24 लक्ष 92 हजार 168 ऐवढी आहे. तत्पूर्वी सहायक निबंधक अर्चना माळवे यांनी उपस्थितांना मुख्यमंत्री यांचा संदेश वाचून दाखविला. यावेळी सहकार विभागाचे सुनील भालेराव, कैलास खटारे, नितीन देशपांडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब गाढे पाटील, अग्रणी बँक व्यवस्थापक कैलास कुमरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी