लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कृषिपंपांची वीज जोडणी तोडू नये, जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी, निराधारांच्या समस्यांवर उपयायोजना कराव्या, आदी मागण्यांसाठी गुरूवारी माजीमंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात काँग्रेसने जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले.जिल्ह्यात कृषिपंपांची वीज जोडणी कापणे सुरू आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. ही कारवाई बंद करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. तसेच जिल्ह्यात त्वरित कोरडा दुष्काळ जाहीर करावा, नागपूर-तुळजापूर महामार्गावरील शेतकºयांच्या जमिनीला समृद्धी महामार्गाप्रमाणे मोबदला द्यावा, जिल्हा व तालुका पातळीवरील संजय गांधी निराधार योजना व इतर समित्यांचे गठन करावे, दिव्यांग, निराधारांचे मानधन दुप्पट करावे, आदी मागण्या निवेदनातून केल्या.जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी माजीमंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांच्याशी चर्चा करून लगेच महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना कृषिपंपांचा वीज पुरवठा पूर्ववत ठेवण्याचे आदेश दिले. निवेदन देताना माजीमंत्री अॅड. शिवाजीराव मोघे, आर्णीचे माजी नगराध्यक्ष अनिल आडे, बाळासाहेब शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव मेश्राम, राजीव विरखेडे, आरीज बेग, विजय मोघे, जितेंद्र मोघे, डॉ. विजय कडू, अहेमद तंवर, नीलेश बुटले, रामभाऊ साठे, राजेश निकोडे, अनिल राठोड आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 12:59 AM
कृषिपंपांची वीज जोडणी तोडू नये, जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी, निराधारांच्या समस्यांवर उपयायोजना कराव्या, ....
ठळक मुद्देकाँग्रेसचे निवेदन : कृषिपंपांची वीज जोडणी न तोडण्याची मागणी