नेर दुष्काळग्रस्त घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:32 PM2018-09-26T23:32:41+5:302018-09-26T23:34:53+5:30
पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यात सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाने त्वरित सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच नेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटीतर्फे नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यात सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाने त्वरित सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच नेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटीतर्फे नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांना देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, सदस्य आदींची उपस्थिती होती.
सोयाबीन व कपाशी या पिकावर शेतकऱ्याची संपूर्ण आर्थिक स्थिती अवलंबून असते. पावसाअभावी ही दोनही पिके हातची गेली आहे. घरात कुठलेही उत्पादन येणार नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदतीची गरज आहे. यासाठी सर्वेक्षण महत्त्वाचे आहे आदी बाबी या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचा समावेश आहे.
निवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक भेंडे, माजी अध्यक्ष राजेंद्र माहुरे, सत्यविजय गुल्हाने, बासिद खान, परसराम राठोड, सुदाम राठोड, महम्मद आशिक, अनिल चव्हाण, मोहन खोडके, राजेंद्र चिरडे, रत्नाबाई मिसळे, बापूराव रंगारी, मो. राजिक मो. सादिक, सतीश तलवारे, दिलीप खडसे आदी उपस्थित होते.