प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : यावर्षीच्या अपुºया पावसामुळे तालुक्यातील भूजल पातळी खालावली आहे. यामुळे येत्या उन्हाळ्यात तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावण्याची चिन्हे आहे.तालुक्यात अरूणावती धरण आहे. मात्र अपुºया पावसामुळे या धरणात केवळ २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शहरासह तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. तालुक्यात ३३ हजार ८५६ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. तथापि अपुºया पावसामुळे यावर्षी बहुतांश पिके संकटात सापडली. परिणामी सोयाबीन उतारा कमी येत आहे. कपाशीवरही विविध कीडींनी आक्रमण केल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहे. त्यातच फवारणीतून विषबाधा होत असल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.हवामान विभागाने यावर्षी चांगला पाऊस पडण्याचे संकेत दिले होते. मात्र आत्तापर्यंत तालुक्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ४७ टक्के पाऊस झाला आहे. यावर्षी तालुक्यात आत्तापर्यंत ४७३ मिमी पाऊस कोसळला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा पाऊस तब्बल ३०१ मिमीने कमी आहे. पाऊस कमी झाल्याने तालुक्यातील नदी-नाले कोरडे आहेत. अरूणावती धरणातही मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. कमी पावसामुळे तालुक्यातील भूजल पातळी प्रचंड खालावली आहे. त्यामुळे शेतातील विहिरींनाही पुरेसे पाणी आले नाही.अपुºया पावसामुळे पिकांची स्थितीही चिंताजनक आहे. त्यातच शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. शेतातील विहिरींना पाणी नसल्याने पिकांना ओलित करणेही कठीण झाले आहे. यामुळे उत्पन्नात घट येण्याची चिंता शेतकºयांना सतावत आहे. सोबतच उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याचे संकेत मिळत आहे.रबी हंगाम संकटात, सिंचनाची समस्याअपुºया पावसामुळे खरिपानंतर रबी हंगामही संकटात सापडला आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी रबी हंगामात गहू व हरभºयाची लागवड करतात. मात्र यावर्षी भूजल पातळी खालावल्याने शेतातील विहिरींना मोजकेच पाणी असल्याने शेतकºयांना सिंचनाची समस्या सतावत आहे. खरिपातील तूट भरून काढण्यासाठी शेतकरी रबी पिकांची लागवड करून जादा उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात. भूजल पातळी खालावल्याने त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे.
दिग्रसमध्ये भूजल पातळीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 9:49 PM
यावर्षीच्या अपुºया पावसामुळे तालुक्यातील भूजल पातळी खालावली आहे. यामुळे येत्या उन्हाळ्यात तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावण्याची चिन्हे आहे.
ठळक मुद्देपाणीटंचाईचे संकट : अरूणावती धरणात केवळ २२ टक्केच पाणीसाठा