पुसद : तालुक्यातील फुलवाडी येथे आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, पंचायत समिती सदस्य संगीता बोके, नायब तहसीलदार भाऊ कदम, राजेंद्र चव्हाण, सरपंच संगीता दिलीप जाधव, उपसरपंच ईशान राजेंद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी दलित वस्ती सिमेंट रोड, १४ वा वित्त आयोगअंतर्गत शाळा, तांडा, पाणीपुरवठा योजना, जल जीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण करण्यात आले. संगीता बोके यांच्या निधीतून वाॅटर एटीएम, वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेंतर्गत शाळा, तांडा येथील सिमेंट रोड, सार्वजनिक शौचालय, संत लोभीवंत महाराज मंदिरासमोर सेवा भवन आदी विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. राजेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी लोहरा ईजारा, बुट्टी, जामनाईक येथील सरपंच, विविध विभागाचे कर्मचारी व फुलवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते. संचालन गजानन पाचकोरे यांनी केले. यशस्वीतेकरिता ग्रामपंचायत सदस्य विमल तुकाराम राठोड, वंदना रमेश कांबळे, पुण्यरथा दत्तराव बेले, शामराव दगडू चव्हाण, अंकोश भिका राठोड, सचिव बी.एस. गुळवे आदींनी परिश्रम घेतले.
फुलवाडी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 4:39 AM