दोन वर्षांपासून राजकीय उदासिनतेने रखडलेल्या या टाकीचे काम नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी अवघ्या दोन महिन्यात पूर्ण केले. शैलेश वानखडे यांच्या अधिग्रहित केलेल्या बोअरवरून शुद्ध पाण्याचा पुरवठा मंगळवारपासून या नवीन पाण्याच्या टाकीमधून सुरू करण्यात आला. काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार किशोर धोटे व कारागीर नंदू बैस यांनी सहकार्य केले.
आता लवकरच वंचित राहिलेल्या भागात २७०० मीटरचे नळ योजनेची पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीकडे बरेच वर्षांपासून लाखो रुपयांचे वीजबिल थकीत आहे. ते भरण्यासाठी आणि विकासकामांसाठी नागरिकांनी घर टॅक्स भरून सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच इंगळे यांनी केले. यावेळी घनकचरा व्यवस्थापनाच्या १३ लाख प्रती वर्षे, असे पाच वर्षांच्या कामाचे भूमिपूजन गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांच्या हस्ते करण्यात आले. ते काम त्वरित करण्याचे आश्वासन कंत्राटदार आशिष भोयर यांनी दिले. यावेळी सीताराम वाघ, राहुल ढवळे, लक्ष्मण कोरवते, पालिका सिसले, दामिनी सिसले, अमृता कुमरे, राजश्री पेंदोर, चंदा राठोड, सुनीता अहिरकर, बालू बोबडे, सुनील निबुदे, सनी लोणकर, उमेश वाघाडे, उल्हास राठोड, दिवाण टेकाम, मोतीराम पेंदोर, दत्ता कोरवते, ग्रामसेवक श्रीनिवास बोईनवार, ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.