शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पैनगंगा नदी तीरावरील गावात तीव्र पाणीटंचाई

By admin | Published: July 20, 2014 12:11 AM

उमरखेड तालुक्यातून वाहणारी पैनगंगा नदी आटल्याने तीरावर राहणाऱ्या ५० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी या भागात आलेच नाही. त्यामुळे पिण्यासाठी

उमरखेड (कुपटी) : उमरखेड तालुक्यातून वाहणारी पैनगंगा नदी आटल्याने तीरावर राहणाऱ्या ५० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी या भागात आलेच नाही. त्यामुळे पिण्यासाठी पाण्याची कुठलीही पर्यायी व्यवस्था नसल्याने अनेक कुटुंब स्थलांतरणाच्या तयारी आहे. हे भयावह चित्र तालुक्यात दिसत आहे. सर्वत्र कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा हाहाकार झाला आहे. उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदी तीरावर जवळपास ५० गाव आहेत. या गावांना पावसाळ्यात पुराचा तर उन्हाळ्यात पाणीटंचाईचा चटका सहन करावा लागतो. दरवर्षीप्रमाणे आताही पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. पात्रात जेमतेम पाणी होते तेही पूर्णपणे आटले आहे. जून महिना संपून जुलै संपण्याच्या मार्गावर आहे. तरी वरुण राजाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे पाऊस आलाच नाही. पावसाचे पाणी नसल्यामुळे नदी आटली. त्यामुळे पाण्याची पातळीही खोल गेली आहे. या भागातील विहिरी व कूपनलिकांचे पाणी आटले आहे. याचा परिणाम नदी तिरावरील गावातील पाणीपुरवठा योजनेवर झाला आहे. अनेक गावातील नळ योजना कुचकामी ठरली आहेत. पैनगंगा नदी तीराबरोबरच इतर गावातही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र अद्यापही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे जवळपास ७० गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहे. प्रशासनाने कृती आराखडा तयार केला. मात्र त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत नसल्याने दरवर्षी त्याच त्या गावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. पण त्यावर कायम उपाययोजना केली जात नाही. तालुक्यातील झाडगाव, तिवरंग, हातला, दिवटपिंप्री, पळशी, मार्लेगाव, तिवडी, लिंबगव्हाण, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, देवसरी, लोहरा, कारखेड, दिघडी, उंचवडद, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, ब्राह्मणगाव, सोईट, ढाणकी, गाजेगाव, सावळेश्वर, अकोली, पिरंजी, करंजी, बिटरगाव, भोजनगर, तरोडा, धनज, धानोरा, हरदडा, वांगी, बिटरगाव, बोथा (वन), चिल्ली या ठिकाणी पाण्याचा ठणठणाट झाला आहे. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा झाल्याने जलस्रोत संपुष्टात आले आहे. त्यामुळे नदी तीरावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र रुप धारण करीत आहे. गावकऱ्यांसोबतच वन्य जीवांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पैनगंगा अभयारण्यात वनविभागाने पाणवठे निर्माण केले. पण त्यामध्ये पाणी नाही. त्यामुळे वन्यजीव गावकुसाकडे चाल करीत आहे. दोन दिवसांपूर्वीच याचा परिणाम जवराळा येथील २० वर्षीय युवकावर अस्वलाने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले आहे. (वार्ताहर)