शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

पोलीस निरीक्षकांची सेवाज्येष्ठता यादी सदोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 10:36 AM

उपअधीक्षक पदावर बढती देण्याच्या दृष्टीने महासंचालक कार्यालयाने जारी केलेली पोलीस निरीक्षकांची निवड सूची (ग्रेडेशन) सदोष असल्याचा प्रकार उघडकीस आला. सदर यादीत वरिष्ठ निरीक्षकांच्या आधी चक्क ५५ कनिष्ठ निरीक्षकांना स्थान देण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहासंचालक कार्यालयाचा कारभारवरिष्ठांच्या आधी चक्क ५५ कनिष्ठ अधिकाऱ्यांची नावे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उपअधीक्षक पदावर बढती देण्याच्या दृष्टीने महासंचालक कार्यालयाने जारी केलेली पोलीस निरीक्षकांची निवड सूची (ग्रेडेशन) सदोष असल्याचा प्रकार उघडकीस आला. सदर यादीत वरिष्ठ निरीक्षकांच्या आधी चक्क ५५ कनिष्ठ निरीक्षकांना स्थान देण्यात आले आहे.पोलीस महासंचालक कार्यालयाने २०१७ ला निरीक्षकांची ज्येष्ठता यादी जारी केली. नेमकी तशीच ज्येष्ठता यादी १ जानेवारी २०२० ला जारी करण्यात आली. या यादीत फारसा बदल नसल्याचे सांगितले जाते. या यादीतील काही पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त झाले. तर काही ज्येष्ठांना डावलून मागे फेकण्यात आले. त्याऐवजी तब्बल ५५ कनिष्ठ निरीक्षकांना वरच्या जागेवर स्थान देण्यात आले. या सदोष यादीबाबत राज्यात निरीक्षकांमधून संताप व्यक्त होत आहे.

यादी निरीक्षकांपर्यंत पोहोचतच नाही१ जानेवारीला जारी निरीक्षकांची ज्येष्ठता यादी घटक पोलीस प्रमुखांनी त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक होते. परंतु बहुतांश ठिकाणी ही यादी निरीक्षकांपर्यंत पोहोचविलीच जात नाही.

महासंचालकांकडे निवेदनांचा सपाटासहा महिन्यानंतर ही यादी बाहेर आली असून त्यातील उणिवा दृष्टीस पडत आहे. त्यामुळे अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी निरीक्षकांनी महासंचालक कार्यालयाकडे निवेदने पाठविण्याचा सपाटा लावला आहे. कनिष्ठ असूनही वरिष्ठांच्या आधी ज्येष्ठता यादीत स्थान मिळविलेल्या पोलीस निरीक्षकांमध्ये पिंपरी चिंचवड, हिंगोली, सोलापूर ग्रामीण, ठाणे शहर, नवी मुंबई, रायगड, नागपूर शहर, एसीबी, बृहन्मुंबई, पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ, औरंगाबाद शहर, नंदूरबार, लातूर, पुणे शहर, पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा, अहमदनगर, सांगली, लोहमार्ग मुंबई, बुलडाणा, नागरी संरक्षण विभाग, यवतमाळ, नाशिक शहर, धुळे, एटीएस, सीआयडी पुणे, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

लिपिकवर्गीय यंत्रणेचा निष्काळजीपणाज्येष्ठ पोलीस निरीक्षकांना सध्या पोलीस उपअधीक्षक पदावरील बढतीचे वेध लागले आहे. पदोन्नतीची ही यादी जारी होण्याची शक्यता असतानाच निवड सूचीतील दोष पुढे आल्याने पदोन्नतीच्या वाटेवरील अनेक निरीक्षक अस्वस्थ आहेत. महासंचालक कार्यालयातील कक्ष अधिकारी व लिपिकवर्गीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे यादीत हा घोळ झाल्याचा पोलीस निरीक्षकांचा सूर आहे.

घटक प्रमुखांवर फोडतात खापरमहासंचालक कार्यालयातील लिपिकवर्गीय यंत्रणा मात्र घटक पोलीस प्रमुखांवर खापर फोडताना दिसते. घटक प्रमुख अर्धवट माहिती पाठवितात, विलंबाने पाठवितात किंवा पाठवितच नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांची प्रकरणे खुली ठेवावी लागतात, पदोन्नती न मिळाल्यास हे अधिकारी ‘मॅट’मध्ये जातात आदी ठपका ठेवला जातो. दोष कुणाचाही असला तरी फटका मात्र निरीक्षकांना बसतो.ही यादी तात्पुरती आहे. त्यावर आक्षेप मागविले गेले आहे. ते प्राप्त होताच सुधारणा करून अंतिम ज्येष्ठता यादी जारी केली जाईल. ही पदोन्नतीची यादी नसून ग्रेडेशन लिस्ट आहे. पोलीस निरीक्षक चुकीच्या दुरुस्तीसाठी अर्ज करू शकतात. लॉकडाऊनमुळे अंतिम यादी जारी झालेली नाही. परंतु सर्वांना आपल्या माहितीतील चुक दुरुस्तीची संधी दिली जाईल.- राजेश प्रधानपोलीस महानिरीक्षक (आस्थापना), मुंबई.

टॅग्स :Policeपोलिस