लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष सुभाष दुधे यांच्या खून प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी बारी समाज संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.बारी समाजाच्या शिष्टमंडळाने महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरूवारी मुंबईत येथे भेट घेतली. या भेटीत त्यांना प्रकरणाची हकीकत कथन केली. यावेळी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.गेल्या १४ आॅक्टोबरला येथील भाजी मार्केट परिसरात सुभाष दुधे यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. संपूर्ण तालुक्याला हादरवून सोडणाऱ्या या घटनेचा विविध स्तरावरून निषेध करण्यात आला. समाजाच्यावतीने शांततेच्या मार्गाने जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर समाजाचे शिष्टमंडळ मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.निवेदनातून सदर खून खटला जलदगती न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी आणि या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी, आदी मागण्या करण्यात आल्या.या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येईल. तसेच खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती बारी समाजातर्फे देण्यात आली.
दारव्हा बारी समाजाचे ‘सीएम’ना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 11:45 PM
येथील नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष सुभाष दुधे यांच्या खून प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी बारी समाज संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
ठळक मुद्देखून खटला : जलदगती कोर्टात चालवा, दोषींवर कारवाई करा