कुशल कामावर वापरण्यात येणारे साहित्य निकृष्ट आहे. कोणत्याही कामाकडे कोणताही तांत्रिक अधिकारी साधा फिरकलासुद्धा नाही. आवश्यकता असलेल्या लोकेशनमध्ये काम न करता मर्जीच्या आणि नफ्याच्या ठिकाणी काम सुरू करण्यात आले. मजुरांचे मस्टर बोगस आहे. सधन लोकांच्या नवाने मोठ्या प्रमाणात देयक उचलले जात आहे. या संपूर्ण कामाची चौकशी करावी, संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य लता नरेश रामटेके, दीक्षा प्रकाश करमनकर, सीमा संतोष चोपडे, हर्षाली अनिल चौधरी, आशा गोविंद भिसे, रुचिता गणेश एकडवार, धीरज गावंडे यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडे ही मागणी करण्यात आली. संबंधितांवर कोणती कारवाई होते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बॉक्स
लता रामटेके यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीत मनरेगाची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. सचिव कोणत्याही कामाची माहिती देत नाही. कामे न करताच मोठ्या प्रमाणात बोगस मजुरांच्या नावाने देयक उचलले जात आहे.