भाजप व्यापारी आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विवेक बनगिनवार यांनी तहसीलदार राजेश वजिरे यांना याबाबत निवेदन दिले. त्यातून व्यापाऱ्यांच्या स्वतंत्र लसीकरण केंद्राची व्यवस्था वेगळी करून व्यापाऱ्यांना सर्वांसोबत गर्दीत जास्त वेळ उभे न राहता त्वरित लस मिळेल, अशी व्यवस्था करण्याची मागणी केली. लॉकडाऊन संपल्यानंतर बाजारपेठ खुली झाली. आता ग्राहकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या सोयीचा विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाशी लढा देण्यासाठी लसीकरण काळाची गरज झाली आहे. आता मोठ्या प्रमाणावर कोरोना लस उपलब्ध झाली आहे. लॉकडाऊन संपल्यामुळे पुन्हा कोरोनाचा संसर्ग बाजारपेठेतून होऊ शकतो. अशा स्थितीत व्यापारी बंधूंचे लसीकरण त्वरित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना जिल्हा सचिव प्रमोद बनगिनवार, तालुकाध्यक्ष रवींद्र अरगडे उपस्थित होते.