जीर्ण कोंडवाड्यामुळे अपघाताचा धोका
पांढरकवडा : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान करतात. त्यामुळे अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीअंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, या कोंडवाड्याची अवस्था अतिशय वाईट झाली असून, यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे.
महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले
पांढरकवडा : महामार्गावर वडकी ते पिंपळखुटी दरम्यान सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. यामुळे अनेकांना या अपघातात आपला जीव गमवावा लागतो. तसेच अनेकजण अपघातात गंभीर जखमी होत आहेत. मात्र, हे अपघात रोखण्यासाठी कुठल्याही उपाययोजना महामार्ग पोलीस करताना दिसत नाही.
धूम्रपान बंदी कायदा धाब्यावर
पांढरकवडा : तंबाखूच्या किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाची दखल घेऊन शासनाने २००८ पासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदीचा निर्णय घेतला. इतके वर्ष लोटल्यानंतरही या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे कारवाई करण्याची गरज आहे.
मारेगाव-मार्डी मार्गावर जिवघेणे खड्डे
मारेगाव : मारेगाव शहरातून गेलेल्या मारेगाव ते मार्डी या नऊ किलोमीटर रस्त्याची जड वाहतुकीमुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे चुकवीत वाहने चालविताना वाहनचालकांची तारांबळ उडत असून, अनेकदा अपघात घडून अनेकांना अपंगत्व ओढवलले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.