लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य सरकारने एनपीआर/एनआरसी/सीएए विरोधात विधानसभेत ठराव पारित करावा, असे ‘विनंती निवेदन’ वंचित बहुजन आघाडीतर्फे पालकमंत्री, आमदारांना देण्यात आले.केंद्र सरकारने पारित केलेले सदर कायदे देशातील विविध समाज घटकांसाठी घातक आहेत. भारतीय संविधानाची पायमल्ली करणारा आहे. हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात येणार नाही, अशा भूमिकेचा ठराव विधानसभेत करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.पालकमंत्री संजय राठोड, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार ख्वाजा बेग यांना हे निवेदन देण्यात आले. आघाडीचे यवतमाळ शहर अध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, प्रमोद इंगळे, दिनेश करमनकर, कुंदन नगराळे, प्रसन्नजित भवरे, शिवदास कांबळे, गुणवंत मानकर, नंदू मोहोड, प्रमोद पाटील, तालुका अध्यक्ष सचिन शंभरकर, संभाजी लिहितकर, राजेंद्र तलवारे, राजा गणवीर, लक्ष्मणराव पाटील, वासुदेव भारसाकळे, नीलेश स्थूल, एम. साजीद, रहमान, महिला आघाडीच्या पुष्पा शिरसाट, करुणा मून, संध्या काळे, रमाताई कांबळे, धम्मवती वासनिक, सरला चचाणे, जिल्हा प्रवक्ता अॅड. श्याम खंडारे आदींच्या उपस्थितीत निवेदन दिले.नेर येथे काँग्रेस कार्यालयाला निवेदननेर : महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने एनपीआर/एनआरसी/सीएए विरोधात विधानसभेत ठराव पारित करावा, या मागणीचे निवेदन स्थानिक काँग्रेस कार्यालयाला देण्यात आले. बासीद खान यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी प्रेमदास राठोड, प्रा. नाजुक धांदे, प्रशीक धांदे, भाऊराव गायकवाड, मोहीन पटेल, प्रवीण खोब्रागडे, करीम खाँ पठाण, राहुल मिसळे, गणेश गेडाम, प्रकाश भगत, सचिन डोंगरे, पुरुषोत्तम मिसळे, धनराज रामटेके, भीमराव मिसळे आदी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीचे ‘विनंती निवेदन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 6:00 AM