लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आपल्याला पदरी काही तर पैसे मिळतील या आशेने अनेक शेतक?यांनी आपल्या शेतात भाजीपाला लावला. पण त्यांच्या पदरी आता निराशाच पडत असल्याचे दिसून येत आहे. दिग्रस तालुक्यातील देवनगर भागातील गजानन चिरडे आणि भाऊराव दुधे या दोघा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मोठ्या आशेने लावलेला भाजीपाला मनावर दगड ठेवून उपटून काढल व गायीगुरांसाठी पाठवून दिला.
सध्या कोरोनामुळे बाजारभाव मिळत नाही. शिवाय आता सुरु असलेल्या पावसाळी वातावरणामुळे भाजीपाला खराब होतोय. शेवटी कंटाळून या शेतकऱ्यांनी भाजीपाला कोणाच्या तर पोटी पडावा या हेतूने जनावरांना टाकला. शेतातील कोबी, वांगे, घोळ भाजी चक्क गोरक्षणला दान केली आहे. दान करत खर्च जास्त आणि उत्पन्न शून्य असल्याकारणाने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.