यवतमाळ : कोरोनामुळे शिक्षणाकडे खुद्द पालकांचेही दुर्लक्ष होत आहे. म्हणूनच आरटीईअंतर्गत राखीव जागांवर निवड होऊनही ५० टक्के पालकांनी १० जुलै ही अंतिम मुदत उलटल्यावरही आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करून घेतला नाही. जिल्ह्यातील आरटीईअंतर्गत राखीव असलेल्या १,२७५ जागांपैकी आतापर्यंत केवळ ८२१ जागांवर प्रवेश झाले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता आता शासनाने प्रवेश घेण्यासाठी २३ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आधीच आरटीईच्या २५ टक्के जागा गरीब विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी पडतात. त्यातही निवड झाल्यावर दुर्लक्ष केले जात आहे.
कोट
यावर्षी कोरोनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेत बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे वारंवार मुदतवाढही द्यावी लागत आहे. कोरोनामुळे शाळाच बंद असल्याने अनेक पालक आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करण्यासाठी शाळेशी संपर्क साधू शकले नाही. आता मात्र शाळांमध्ये शिक्षक व अन्य कर्मचारी उपस्थित राहत आहेत. त्यामुळे पालकांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.
- प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
तालुकानिहाय शाळा आणि जागा
तालुका शाळा जागा शिल्लक जागा
आर्णी १६ ०४ ३०
बाभूळगाव ०५ १९ ०५
दारव्हा ०७ १० १०
दिग्रस १० १६३ ३३
घाटंजी ०८ ३३ ३३
कळंब ०८ २८ १९
महागाव १३ ८० ०५
मारेगाव ०७ २३ १०
नेर ०६ ३५ १४
पांढरकवडा १५ ५९ १०
पुसद १६ १०६ ४१
राळेगाव ०७ ३२ ११
उमरखेड १८ १३२ ३०
वणी २१ १२३ ५३
यवतमाळ ४० २५७ ६७
झरी ०५ ११ १०