नरेश मानकरलोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : नगरपरिषदेत नगराध्यक्षासह १९ पैकी १४ सदस्य निवडून देऊन पांढरकवडावासीयांनी प्रहार जनशक्ती पार्टीवर विश्वास दाखवित एकहाती सत्ता दिली. पालिकेला विकास कामासाठी मागील चार वर्षात ४४ कोटी ६७ लाखांचा घसघशीत निधीही मिळाला. परंतु नियोजनाचा अभाव असल्याने अनेक कामांना मुहूर्तच मिळाला नाही. दुसरीकडे मंजूर असलेली अनेक कामेही रखडलेली असल्याने शहरवासीयांचा मोठा अपेक्षाभंग झाल्याचे दिसून येते. शहरात योग्य नियोजनाअभावी कामांवर खर्च करूनही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात सत्ताधारी कमी पडल्याच्या नागरिकांच्या भावना आहेत. त्यामुळेच नागरिकांना विविध समस्यांचा आजही सामना करावा लागत आहे. शासनाच्या विविध योजनांअंतर्गत विकास कामांसाठी मिळालेल्या निधीतून विकास कामे करण्यात आली. परंतु कामाचे नियोजन आवश्यक असताना, मूलभूत सोयी-सुविधांऐवजी इतर कामांना प्राधान्य दिले असल्याचे दिसते.
अतिक्रमणांची समस्या कायम शहरातील मुख्य बाजारपेठ, आठवडी बाजार परिसर, डीपी रोड, बसवेश्वर चौक ते डायमंड चौक, शिबला पॉईंट्सह अनेक ठिकाणी अतिक्रमणांची समस्या कायम आहे. शहरातील रस्ते मोठे असूनही व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच अतिक्रमण केल्यामुळे रस्ते अरुंद बनले आहेत.
रस्त्यांची दयनीय अवस्थापावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. वाहतुकीचा रस्ता असलेल्या वाय पॉईंट ते बसवेश्वर चौकादरम्यान, बिरसा मुंडा चौक ते स्टेट बँक रोड, तसेच वसंतराव नाईक चौक ते विश्रामगृह रोड ते बिर्सा मुंडा चौकदरम्यान मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा होत आहे.
नवीन वसाहतीत घाणीचे साम्राज्यशहरात नवीन झालेल्या काही वसाहतींमध्ये नाल्यांची कामे न झाल्यामुळे सांडपाणी मोकळ्या जागेत व रस्त्यावर येत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. नीलकंठनगरमध्ये नाल्यांचे बांधकाम न केल्याने सांडपाणी मोकळ्या जागेत जमा होत आहे. त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे.
पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी
पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ च्या जुन्या पुलावरून जाणाऱ्या रस्त्यावरही घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथे पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना जीव मुठीत घ्यावा लागतो.
वारंवार वाहतूक होते ठप्प
शहराच्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा भाजीपाला, फळ विक्रेते व मिठाईवाल्यांची दुकाने लागतात. त्यातच गुरांचा ठिय्याही रस्त्यावरच असतो. त्यामुळे वाहतूक वारंवार ठप्प होते. यामुळे पांढरकवडावासीय त्रस्त झाले आहेत.
ही महत्त्वाची कामे आहेत अर्धवट स्थितीतशहराला खुनी नदीच्या पाण्याद्वारे पाणीपुरवठा होतो. या योजनेची पाईपलाईन बदलणे आवश्यक असताना, हे काम रखडले आहे. हिंदू स्मशानभूमीवरील मोठ्या शेडचे बांधकामही सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात रखडलेलेच आहे. महादेव घाट सौंदर्यीकरणाचे कामही जैसे थे आहे.