शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

शिक्षक भरती सुरू होऊनही ‘डीएड’ नापसंतच !

By अविनाश साबापुरे | Published: June 28, 2024 6:56 PM

नऊ हजारांवर जागा राहणार रिक्त : ३० हजार जागांसाठी २१ हजार विद्यार्थ्यांचेच अर्ज

अविनाश साबापुरेयवतमाळ : गेल्या वर्षीपासून राज्यात शिक्षक भरती सुरू झाली आहे. त्यामुळे डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढेल, अशी अटकळ असताना, यंदाही विद्यार्थ्यांनी डीएडकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. या अभ्यासक्रमासाठी राज्यात उपलब्ध असलेल्या ३० हजार ८०७ जागांसाठी केवळ २१ हजार १०० विद्यार्थ्यांनीच अर्ज केले. त्यामुळे ९ हजार ७०७ जागा यंदाही रिक्तच राहणार आहेत.

बारावीचा निकाल लागल्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ३ जूनपासून डीएडची प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी १८ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. परंतु, प्रतिसाद न मिळाल्याने अर्ज भरण्यासाठी २५ जूनपर्यंत मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही अपेक्षित अर्ज आलेले नाहीत. विशेष म्हणजे, याकरिता बारावीत केवळ ४९.५ टक्के इतके जुजबी गुण असलेला विद्यार्थीही प्रवेश अर्ज भरण्यास पात्र होता, तरीही उपलब्ध जागांएवढेही अर्ज न आल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी डीएड अभ्यासक्रमाबाबत नापसंती दर्शविल्याचे चित्र आहे.

अशी आहे राज्यातील डीएडची स्थिती?जिल्हा : विद्यालय : जागा : आलेले अर्जयवतमाळ : १४ : ७२० : ६५१वाशिम : ०६ : ३५० : ३६३बुलढाणा : २४ : १४६० : ९६९अमरावती : ०९ : ४८७ : ४८६अकोला : ०९ : ४२७ : ३७५भंडारा : ११ : ५८७ : ४१८चंद्रपूर : ०२ : ९० : ३६३गडचिरोली : ०३ : २०० : ६६गोंदिया : १८ : ८९० : ६४६नागपूर : ३० : १४८२ : ५५८वर्धा : १० : ३९७ : १०६रत्नागिरी : ०४ : २७० : १३७सिंधुदुर्ग : ०५ : १८७ : ६०लातूर : २७ : १५९० : ११५९नांदेड : २० : ११९७ : ११२१धाराशिव : १६ : ७८० : ३४८संभाजीनगर : ३५ : २०५७ : ११४३बीड : ३० : १६२५ : १५२९हिंगोली : ०७ : ४६० : २९८जालना : १० : ६५० : ५४४परभणी : १२ : ६५० : ६७६कोल्हापूर : २० : १०२७ : ६४४सांगली : १५ : ६७७ : ४५४सातारा : १० : ४०० : २७६अहमदनगर : ३४ : १८३० : १०१८पुणे : २१ : १२६० : ५९६सोलापूर : २९ : १६९५ : १०१४धुळे : २१ : १२६० : ४६६जळगाव : १५ : ८५० : ६१९नंदुरबार : १० : ६५० : २८९नाशिक : २४ : ९६० : १८१७ठाणे : २६ : १४६० : ४६१रायगड : ०३ : १५० : ६८पालघर : ०६ : २८४ : ५४६मुंबई : ३३ : १७४८ : ८१६एकूण : ५६९ : ३०,८०७ : २१,१००

विद्यार्थ्यांचा कल थोडा बदलताना दिसत आहे. त्यामुळे कदाचित अर्ज कमी आले असतील. आता विद्यार्थ्यांना सिट अलाॅटमेंट होईल. सिट अलाॅटमेंट झाल्यानंतर शासनाच्या परवानगीने जेव्हा विशेष फेरी घेतली जाईल, तेव्हा कदाचित आणखी विद्यार्थ्यांचे अर्ज येतील.- डाॅ. माधुरी सावरकर, उपसंचालक, एससीईआरटी, पुणे

या जिल्ह्यातील विद्यालयांवर संकट गडदनाशिक वगळता जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये डीएडच्या उपलब्ध जागांपेक्षा अर्जांची संख्या कमी आहे. त्यातल्या त्यात गडचिरोली, वर्धा, सिंधुदुर्ग, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, सातारा, पुणे, मुंबई, सोलापूर, धुळे, नंदुरबार, ठाणे, रायगड या जिल्ह्यांत उपलब्ध जागांच्या निम्मेही अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे येथील अनेक अध्यापक विद्यालयांवर बंदीचे संकट घोंगावत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षणYavatmalयवतमाळ