शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

जिल्ह्यात चोरीच्या गुन्ह्यांचे डिटेक्शन २५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 5:00 AM

जिल्हा पोलीस दलाने विविध पातळीवर काम केले. यात वर्षभरातील गोषवारा संमिश्र स्वरूपाचा आहे. काही गुन्ह्यांचे प्रमाण घटविण्यात पोलिसांना यश आल्याचे त्यांच्या आकडेवारीवरून दिसून येते. मात्र घरफोड्याचे गुन्हे उघड करण्याचे आव्हान कायम आहे. खून, बलात्कार या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे तर खुनाचा प्रयत्न, विनयभंग, दरोडा, जबरी चोरी, दुखापत, दंगा, फसवणूक, दिवसा घरफोडी, रात्र घरफोडी, सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ले यात घट झाल्याचे अहवालावरुन दिसून येते.

ठळक मुद्देवर्षभरात ५७ खून : १५ अग्निशस्त्र व १३६ काडतूस जप्त, गुन्ह्यांचा आलेख नियंत्रणात असणारी आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वर्षभरात जिल्ह्यात घरफोडीच्या ९०३ घटना घडल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत २९ गुन्हे कमी झाले आहे. मात्र यातील डिटेक्शनचे प्रमाण केवळ २४.९१ टक्के इतकेच आहे. खुनांच्या घटनांमध्ये दोनने वाढ झाली असून वर्षभरात ५७ खून झाले. विनयभंगाच्या गुन्ह्यात लक्षणीय घट झाली आहे. तर बलात्काराचे गुन्हे वाढले आहे.जिल्हा पोलीस दलाने विविध पातळीवर काम केले. यात वर्षभरातील गोषवारा संमिश्र स्वरूपाचा आहे. काही गुन्ह्यांचे प्रमाण घटविण्यात पोलिसांना यश आल्याचे त्यांच्या आकडेवारीवरून दिसून येते. मात्र घरफोड्याचे गुन्हे उघड करण्याचे आव्हान कायम आहे.खून, बलात्कार या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे तर खुनाचा प्रयत्न, विनयभंग, दरोडा, जबरी चोरी, दुखापत, दंगा, फसवणूक, दिवसा घरफोडी, रात्र घरफोडी, सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ले यात घट झाल्याचे अहवालावरुन दिसून येते. प्रतिबंधात्मक कारवाईत मागील वर्षीच्या तुलनेत कामगिरी वाढली आहे. १०७ कलमानुसार १३ हजार ९१६ जणांविरुद्ध कारवाई झाली. सीआरपीसी ११० नुसार ७५३ जणांवर कारवाई केली. महाराष्टÑ पोलीस कायदा कलम १२२ नुसार १०१ जणांवर कारवाई झाली. एमपीडीए अंतर्गत सात जणांवर कारवाई केली आहे. मागील वर्षी सहा जणांना एमपीडीएत टाकण्यात आले होते. हत्यार अधिनियमांतर्गत यावर्षी सात पिस्टल व आठ देशीकट्टे असे ११ अग्नीशस्त्र जप्त केले. यात २३ आरोपी असून १३६ जीवंत काडतूस जप्त केले आहे. धारदार शस्त्राच्या ७९ केसेस केल्या असून १३७ आरोपींकडून ५४ तलवारी, ४८ चाकू व चार सत्तूर जप्त केले आहे.दारूबंदी व जुगार कारवाईची सर्वाधिक प्रकरणेदारुबंदी कायद्याखाली पाच हजार २१ गुन्हे नोंद झाले. तर जुगार कायद्यांतर्गत एक हजार ८९४ गुन्हे दाखल केले. दारूबंदी कायद्यात चार कोटी ४४ लाख दोन हजार ६८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार कायद्यांतर्गत एक कोटी ४७ लाख ८९ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.वर्षभरात ९५ गुन्हेगार तडीपारप्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत १६ हजार २६ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यामध्ये ९५ जणांना तडीपार करण्यात आले. तर सात जणांवर एमपीडीएची कारवाई केली.गुन्हे दोषसिद्धीत जिल्हा ‘टॉपटेन’मध्येदाखल गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. एकूण खटल्यांपैकी ४३ टक्के प्रकरणात गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे. या कामगिरीने जिल्हा राज्यातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये समाविष्ठ झाला आहे. सीसीटीएनएसप्रणालीमध्ये जिल्ह्याने सलग दुसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय लोकसभा, विधानसभा निवडणूक, महत्वांच्या व्यक्तीचे दौरे, सभा, सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखली आहे.

 

टॅग्स :Socialसामाजिक