शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

उदयोन्मुख महिला सरपंचाने साधला कुंभारीचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:39 PM

तालुक्यातील कुंभारी गावातून पहिल्यांदा सामान्य महिला मधून प्रिती सतीश भोयर यांची सरपंच म्हणून निवड झाली. बी.ए.पर्यंत शिक्षण झालेल्या प्रितीतार्इंनी गावात विकास कामाचा सपाटा लावला.

ठळक मुद्देविविध पुरस्कार प्राप्त : विकास कामांसाठी गावात आणला कोट्यवधींचा निधी

विठ्ठल कांबळे ।ऑनलाईन लोकमतघाटंजी : तालुक्यातील कुंभारी गावातून पहिल्यांदा सामान्य महिला मधून प्रिती सतीश भोयर यांची सरपंच म्हणून निवड झाली. बी.ए.पर्यंत शिक्षण झालेल्या प्रितीतार्इंनी गावात विकास कामाचा सपाटा लावला. त्यामुळे या गावाने तालुका ते राज्य पातळीपर्यंत आपला ठसा उमटविला. या उदयोन्मुख नेतृत्वाचा ‘लोकमत’ने सरपंच अवार्ड देऊन गौरव केला.सरपंचपदी निवड होताच सर्वप्रथम प्रितीतार्इंनी ग्रामसभेद्वारे जेष्ठ नागरिक व तरुणांच्या सहकार्याने विविध समित्या स्थापन केल्या. कामाच्या गरजेनुसार तीन टप्पे करण्यात आले. त्यात अत्यावश्यक गावाची गरज, आवश्यक गावाची गरज आणि सोईनुसार गावाची गरज अशी विभागणी केली. त्यानुसार कामाला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने कुंभारी गाव महाराष्टÑ शासनाच्या आदर्श गाव उपक्रमासाठी निवडले गेले. जिल्हाधिकाºयांनी या गावाच्या विकासासाठी दोन कोटी २० लाख रुपये मंजूर केले. त्यामुळे गावाच्या विकासात भर पडली. केंद्र शासनाच्या स्मार्ट व्हिलेज जिल्ह्यातून गावाची निवड झाली. आता विभागीय स्पर्धेसाठी गाव प्रस्तावित आहे. आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेत या गावाने भाग घेतला. नाम संस्थेचे उपक्रम घाटंजी विकास गंगा संस्थेच्या माध्यमातून राबविले जातात.गावातील नाल्यांचे रुंदीकरण, वृक्ष लागवड, हायमास्क लाईट, स्मशानभूमी सौंदर्यीकरण, डिजीटल अंगणवाडी, कोपरा गार्डन, आदिवासी चावडी, दलितवस्ती सुशोभिकरण, महात्मा गांधी भवन, घरकूल योजना, मंदिर सौंदर्यीकरण, पाणी पुरवठा, गुरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासोबतच, नशाबंदी, नसबंदी, चराईबंदी, लोटाबंदी, कुऱ्हाडबंदी आदी उपक्रम राबविण्यात आले. शुद्ध पाण्यासाठी मशीन बसवून पाच रुपयात एटीएम द्वारे २० लीटर पाणी दिले जात आहे. गावात मुख्य ठिकाणी १२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. चुलमुक्त योजनेतून ३० गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा या गावाला लाभ मिळणार आहे. सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने या गावाची विकासाकडे घोडदौड सुरु आहे.या गावाला निर्मल ग्राम राष्ट्रपती पुरस्कार, तंटामुक्ती पुरस्कार, स्मार्ट व्हिलेज पुरस्कार, आदर्श गाव निवड आदी पुरस्कार मिळाले आहे. सरपंच प्रितीताई भोयर यांना सचिव संतोष माहूरे, उपसरपंच रुपराव डुबे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, बचत गट सहकार्य करीत असते. शिक्षक नारायण भोयर यांचे मोलाचे मार्गदर्शनही त्यांना मिळते.

टॅग्स :sarpanchसरपंच