शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

कळंबमध्ये तयार ‘सारथी’ला जर्मनीतून मिळाले पेटेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 10:16 AM

प्रशांत डेहनकर यांनी एकाचवेळी दोन सिलिंडरची हाताळणी करणारे ‘सारथी’ हे उपकरण तयार केले असून, त्याला जर्मनीसारख्या प्रगत देशामधूनच जागतिक पेटेंट प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देप्रशांत डेहनकर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरातयार केलेले ‘सारथी’ उपकरण

गजानन अक्कलवार

कळंब (यवतमाळ) : पेट्रोलियम आणि गॅस व्यवसायात गत २८ वर्षांपासून असलेले येथील प्रशांत डेहनकर या व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी व गरजांवर अविरत संशोधन कार्य करीत असतात. मागील बारा वर्षांत त्यांनी अनेक उपकरणांची निर्मिती केली असून, इंडियन ऑईल कार्पोरेशनची मान्यता मिळवून त्या उपकरणांचा देशभरात वापरही होत आहे. आता त्यांनी एकाचवेळी दोन सिलिंडरची हाताळणी करणारे ‘सारथी’ हे उपकरण तयार केले असून, त्याला जर्मनीसारख्या प्रगत देशामधूनच जागतिक पेटेंट प्राप्त झाले आहे.

‘सारथी’ हे उपकरण व्यवसायात अतिशय उपयोगी ठरणारे आहे. सारथीच्या माध्यमातून एकाचवेळी व गोडाऊन किंवा गॅस बॉटलिंग प्लांटमध्ये विना प्रयास दोन सिलिंडरची हाताळणी करणे शक्य होणार आहे. पर्यायाने सिलिंडरची ने-आण करताना होणारी आदळआपट बंद होऊन सिलिंडरचे आयुर्मान वाढण्यास मदत तसेच सिलिंडर दुरुस्तीवर होणाऱ्या कंपनीच्या मोठ्या खर्चातही बचत होईल. या उपकरणाचा गॅस बॉटलिंग प्लांट व एलपीजी वितरकांच्या गोडावूनचे ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापर सुरु करण्यात आला आहे. नुकतेच याचे यशस्वी प्रात्यक्षिक इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या धनज (जि. वाशिम) या बॉटलिंग प्लांटमध्ये पार पडले.

एलपीजी गोडाऊन व बॉटलिंग प्लांटवर उपयोग

जगात तंत्रज्ञानाच्या बाबतीत अग्रगण्य असणाऱ्या जर्मनीतील फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी, जर्मन पेटेंट आणि ट्रेडमार्क ऑफिसचे मुख्य कार्याध्यक्ष कॉर्नेलिया रुडलोफ शोफर यांच्याकडून हे पेटंट मंजूर झाले. प्रशांत या यशाचे श्रेय त्यांचे वडील मुरलीधरराव डेहनकर यांना देतात. त्यांचे वडीलसुद्धा संशोधक वृत्तीचे असून, त्यांनी कृषी क्षेत्रात अनेक नवनवे प्रयोग केल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा ‘कृषिभूषण पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला आहे.

‘सारथी’ उपकरणासाठी इंडियन ऑईल कार्पोरेशनचे विक्री अधिकारी नीलेश ठाकरे व मुख्य क्षेत्रीय व्यवस्थापक अनिल मेहेर (नागपूर) यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सारथी या उपकरणाची निर्मिती सुरू असून, लवकरच देशभरातील एलपीजी गोडावून व बॉटलिंग प्लांटवर याचा उपयोग सुरू होईल.

टॅग्स :scienceविज्ञानtechnologyतंत्रज्ञानSocialसामाजिक