लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वांना घरे मिळावी या मागणीसाठी मंगळवारी येथे धडक मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र राज्य शासनाच्या ७ फेब्रुवारी २०१९ च्या परिपत्रकानुसार केंद्र व राज्य सरकारने बेघरांना २०२२ पर्यंत घरे देण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली असून राज्यातील नगरपरिषदांना आदेशदेखील देण्यात आले होते.ज्यात अतिक्रमणधारक महत्त्वाचा घटक आहे. ज्यांना स्वतःची जागा उपलब्ध नसल्यास २०११ पूर्वीपासून वास्तव्यात असलेल्या अतिक्रमणधारकांना लीज पट्टे द्या असे नमूद असूनही आजपर्यंत पालिकेने पट्टे वाटप केलेले नाहीत. ते तत्काळ देण्यात यावेत अशी मोर्चेकरांची मागणी होती. जलाराम मंदिर येथून मोर्चाची सुरुवात झाली. महेश पवार यांच्या नेतृत्वात मोर्चेकरी नगरपरिषद कार्यालयावर धडकले. तेथे मुख्याधिकारी यांच्या नावे निवेदन देण्यात आले. तेथून तहसील कार्यालय येथे जाऊन तहसीलदार पूजा माटोडे यांना निवेदन दिले. अतिक्रमण धारकांची मोजणी थांबल्यामुळे भूमी अभिलेख कार्यालय उपअभियंता यांना निवेदन देऊन आंदोलकांनी राहत्या जागेची मोजणी करण्यासाठी आक्रमक भूमिका मांडली. ग्रामीणमध्येही बरेच लोक घरकुलापासून वंचित आहेत. आजही शेकडो लोक घरकुलाच्या प्रतीक्षा यादीत आहेत. या मोर्चामध्ये संयोजक महेश पवार, मोहम्मद पठाण, गजू भालेकर, प्रसाद वाढई, विश्वास निकम, रफीक बाबू, होमदेव किनाके, मनोज ढगले, मनोज हामंद, अमोल बावने, सागर मोहूर्ले, धीरज भोयर, संजय ढगले, बालू खांडरे, अंकुश ठाकरे, मोरेश्वर वातिले, सूरज उल्हे, प्रितम हिवाळे, कुंदन ऊइके, गजू दीकुंडवार, अशोक भोंग, राहुल गायकवाड, शेंद्रे साहेब, विष्णू शिंदे, अशोक नांदेकर, ललिता डोंगरे, बेबीबाई तलमले, तानबाजी बावणे आदी सहभागी होते.