शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
2
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
3
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
4
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
5
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
6
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
7
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
8
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
9
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
10
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
11
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
12
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
13
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?
14
Irani Cup 2024 : अजिंक्य की ऋतुराज? MUM vs ROI मॅच ड्रॉ झाली तर कोण उचलेल ट्रॉफी?
15
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
16
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
17
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
18
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
19
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
20
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना

जिल्हा परिषद बांधकामात ‘कलेक्शन’साठी धडपड

By admin | Published: January 11, 2017 12:26 AM

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. १ व २ अंतर्गत साडेसात कोटी रुपयांच्या निविदा काढल्या गेल्या आहेत.

साडेसात कोटी : मजूर संस्थांवर निविदा भरण्यासाठी दबाव यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. १ व २ अंतर्गत साडेसात कोटी रुपयांच्या निविदा काढल्या गेल्या आहेत. परंतु आता आचारसंहिता जाहीर झाल्याने या बांधकामातील ‘कलेक्शन’ बुडण्याची भीती संबंधित पदाधिकाऱ्यांना आहे. हे नुकसान टाळण्यासाठी चक्क मजूर कामगार सहकारी संस्थांवर दबाव निर्माण केला जात असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. १ अंतर्गत तीन कोटी तर क्र. २ अंतर्गत साडेचार कोटी अशा एकूण साडेसात कोटी रुपयांच्या बांधकामांच्या निविदा काढल्या गेल्या आहेत. या निविदा भरण्याची मुदत १७ जानेवारीपर्यंत आहे. परंतु अचानक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने या निविदांची पुढील प्रक्रिया वांद्यात सापडली आहे. एवढेच नव्हे तर जिल्हा उपनिबंधकांनी यवतमाळ जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्था संघाला आचारसंहितेमुळे कोणत्याही प्रकारच्या निविदा भरु नये, असे लेखी आदेश दिले आहे. मात्र उपनिबंधकांचे हे आदेश झुगारुन जिल्हा परिषदेचे संबंधित पदाधिकारी व त्यांच्या राजकीय गॉडफादरने ही निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी धडपड चालविली आहे. साडेसात कोटींच्या कामातील ‘कलेक्शन’ बुडू नये यासाठी ही धडपड असल्याचे सांगितले जाते. मजूर कामगार सहकारी संस्था संघाच्या दोन-तीन संचालकांना हाताशी धरुन या निविदा भरण्यासाठी त्यांना प्रलोभने दिली जात आहे. त्यांच्यावर दबावही वाढविला जात आहे. त्यात साडेचार टक्क्यांची ‘मार्जीन’ राहत असल्याचे सांगितले जाते. वास्तविक मजूर कामगार संघात राहून वेगळी भूमिका घेणाऱ्या या दोन-तीन संचालकांच्याच डमी संस्था आहेत. एकाचे तीन तालुक्यात कार्यक्षेत्र असून त्यांच्या तब्बल २० डमी संस्था आहेत. तर अन्य दोघांचे कार्यक्षेत्र एकाच तालुक्यात असून एकाकडे चार तर दुसऱ्याकडे एक डमी संस्था आहे. उपनिबंधकांच्या पत्राचा हवाला देत मजूर कामगार सहकारी संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी साडेसात कोटींच्या या निविदा भरण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. मात्र त्यांच्या या भूमिकेला छेद देत मजूर कामगारच्या दोन-तीन संचालकांनी संघाच्या विरोधात भूमिका घेऊन निविदा भरण्यासाठी इच्छुकांची शोधमोहीम चालविली आहे. (जिल्हा प्रतिनिधी) आचार संहितेला पदाधिकाऱ्यांकडून सुरूंग आचारसंहितेमुळे भूमिपूजन होत नाही, वर्कआॅर्डरही होत नाही, असे असताना या संचालकांचा निविदा भरण्यासाठी ‘इन्टरेस्ट’ का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बांधकाम १ च्या निविदांमधील लाभाचे पाट गॉडफादरच्या घरापर्यंत तर बांधकाम २ च्या लाभाचे पाट पदाधिकाऱ्याच्या घरापर्यंत वाहत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत ऐकायला मिळते.