फोटो
दारव्हा : धनगर समाजाने कोणताही पोटशाखा भेदभाव न पाळता पिवळ्या झेंड्याखाली एकत्र येऊन समाजाच्या उन्नतीसाठी झटावे, असे आवाहन धनगर समाज ऐक्य परिषदेचे राजाध्यक्ष शशिकांत तरंगे यांनी केले.
विदर्भ, मराठवाड्यातील धनगर समाजाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी काढण्यात आलेली संवाद यात्र येथे पोहोचली. यावेळी धनगर समाज सेवा संस्थेच्या वतीने धनगर समाज ऐक्य परिषदेची बैठक घेण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नथ्थूजी महानर होते. मल्हार सेना जिल्हाध्यक्ष यादव गावंडे, दिलीप साप, प्रकाडे उघडे, धनगर समाज सेवा संस्थेचे विदर्भ अध्यक्ष दिलीप बांबल, विदर्भ उपाध्यक्ष भास्कर उघडे, सुनील फुसांडे, मनोहर नवरंगे, दादाराव कापडे, विशाल झाडे, हरीश भिसे, निखिल मस्के, दीपक बांबल, दीपक नवरंगे, निखिल वडे, ओम गोरडे, शरद डाकोरे, श्रीकृष्ण गावनेर, रवी वगरे, करण कोळेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी शशिकांत तरंगे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन विशाल झाडे यांनी केले. यशस्वीतेसाठी धनगर समाज सेवा संस्था, धनगर कर्मचारी संघटना यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला समाजबांधव उपस्थित होते.
090921\img-20210828-wa0020.jpg
दारव्हा येथे संवाद यात्रेचे स्वागत करतांना धनगर समाजबांधव