दारव्हा : येथील जिजाऊ ब्रिगेड व सामाजिक संघटनांच्या वतीने शहरातील पूरग्रस्तासाठी मोफत रोगनिदान शिबिर घेण्यात आले. यावेळी औषधे व इतर साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला डॉ. ॠचा पोटफोडे, डॉ. कोमल सांगाणी, डॉ. अश्विनी भेंडे, डॉ. लिना राठोड, जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष डॉ. कांचन नरवडे, प्रा. अवंती राऊत, ॲड. वैशाली हिरे, आशा डोंगरे, वंदना जाधव, अलका कदम, अरुणा पासले, पुष्पलता चिंतकुटलावार, प्रा. पद्मावती मेश्राम, सीमा चव्हाण, योगिता राठोड, पल्लवी गोहाड, रजनी खिराडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
अतिवृष्टीमुळे नाल्याला आलेल्या पुराचे पाणी घरात शिरल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले. साचलेल्या पाण्यामुळे घाण होऊन त्यापासून विविध प्रकारचे आजार होऊ शकतात, ही बाब लक्षात घेता रोगनिदान शिबिर घेण्यात आले. यावेळी महिला, बालकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. तसेच औषधे व इतर साहित्य वाटप करण्यात आले. वंदना जाधव यांच्या जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. नंतर इतर उपक्रम पार पडले. कार्यक्रमाला शहरातील डॉक्टर व विविध सामाजिक संघटनांनी सहकार्य केले.
280721\img-20210720-wa0010.jpg
शीबीराला उपस्थित पुरग्रस्त भागातील महिला