किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : येथील बाजार समितीने शेतकºयांना लूटण्याचे षडयंत्र सुरू केले. शासनाने सोयाबिनचा हमीभाव तीन हजार रुपये ठरविला. परंतु व्यापाºयांनी १७०० ते १८०० रुपये दराने सोयाबिन उडीदाचे भाव पाडल्याने बाजार समितीत गोंधळ उडाला. यातच व्यापाºयांचा माल त्यांनी अतिक्रमण करून शेतकºयांच्या जागेवर लावला. शेडमध्येही व्यापाºयांनी अतिक्रमण केल्याने शेतकरी राजाची स्थिती वाईट झाली आहे.नेर येथील बाजार समिती एकेवेळी नावाजलेली होती. नांदगाव खडेश्वर कांरजा येथील शेतकरी माल घेऊन नेर बाजार समितीत यायचे. मात्र सध्या मोठ्या शेतकºयांनी कांरजा बाजारपेठेत माल पाठवण्यावर जोर दिला आहे. नेर बाजार समितीत शेतकरी लूटल्या जात आहे. संगनमत करून मालाचे दर पाडण्यात आले आहे. विकायच असेल तर विका नाही तर चालते व्हा, या भूमिकेने शेतकरी कवडीमोल भावात माल विकत आहे. शासनाने सोयाबिनचा हमिभाव जरी घोषीत केला तरी नाफेडमार्फत खरेदी सुरू केली नाही, असा कोणताही आदेश खविसला मिळाला नाही. याचा अर्थ शासकीय खरेदीचा फायदा व्यापाºयांनाच करून देण्याकडे कल प्रशासनाचा आहे. गरजू व गरीब शेतकºयांचे रक्त शोषन केल्या जात आहे. मागिल तूर खरेदी ईतकी उशीरा झाली की शेवटी स्वस्त दरात घेतलेल्या तूर खरेदीचा फायदा व्यापाºयांनाच झाला. नाफेडची तूर खरेदीची जबाबदारी खविसवर आहे. परंतु पूर्ण तूर खरेदी हंगामाचे पंधरा लाख रुपये नाफेडकडे आहे. हमाली व मापारी यांचा पैसा खविसने बाजार समितीकडून साठ हजार रुपये उसनवार काढून भरला. नाफेडने अद्यापही आठ हजार ८८८ क्किंटल तुरीचा चुकारा दिला नाही. दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे, या अवस्थेत भीक मागून दिवाळी साजरी करण्याची वेळ प्रशासनाने गरीब शेतकºयांवर आणली आहे. आज सोयाबीनचे दर आठशे रुपये व कापसाचे दर अडीच हजार ते तीन हजार रुपये आहेत. यावर शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत सभापती रवींद्र राऊत यांना कळल्यावर त्यांनी व्यापाºयांचे अतिक्रमित सोयाबिन उचलण्यास लावले. यावर त्वरीत उपाययोजना करून हुकूमशाही करणाºया व्यापाºयांना लगाम लावावा, अशी मागणी होत आहे.नाफेड आणि खविसची भूमिका अस्पष्टसोयाबिनच्या खरेदीबाबत नाफेडने खरीदीचे पत्र खविसला दिल्याचे सांगितले, मात्र खविसला असे कोणतेही पत्र अद्याप प्राप्त झाले नाही. तुरीचा चुकारा अजूनही बाकी आहे. खविसला कमीशनही मिळाले नाही. यामुळे पत्र आले तरी पैसे नसल्याने आम्ही खरेदी करणार नसल्याचे खविसचे सचिव देशमुख यांनी सांगितले.
नेर बाजार समितीत हुकूमशाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:15 PM
येथील बाजार समितीने शेतकºयांना लूटण्याचे षडयंत्र सुरू केले. शासनाने सोयाबिनचा हमीभाव तीन हजार रुपये ठरविला. परंतु व्यापाºयांनी १७०० ते १८०० रुपये दराने सोयाबिन उडीदाचे भाव पाडल्याने बाजार समितीत गोंधळ उडाला.
ठळक मुद्देकवडीमोल भावात खरेदी : नाफेडची खरेदी करण्यासाठी खविसंचा नकार