शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

आजी-आजोबा झाला का अभ्यास?, उद्या होणार परीक्षा

By अविनाश साबापुरे | Published: March 16, 2024 6:41 PM

नवभारत साक्षरता मोहिमेत गेल्या वर्षभरात आजी-आजोबांनी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कितपत मिळविले, याची कसोटी १७ मार्च रोजी लागणार आहे.

यवतमाळ : नातवंडे दहावी-बारावीच्या परीक्षेत गुंतलेले असताना आता प्रौढ निरक्षरांचीही रविवारी परीक्षा घेतली जाणार आहे. नवभारत साक्षरता मोहिमेत गेल्या वर्षभरात आजी-आजोबांनी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कितपत मिळविले, याची कसोटी १७ मार्च रोजी लागणार आहे. त्यासाठी तीन तासांची लेखी परीक्षा होणार असून जिल्ह्यातील १६ हजार १९९ प्रौढ निरक्षरांची नोंदणी झाली आहे. सोळा तालुक्यातील १०८९ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.जिल्ह्याचे योजना शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्या अखत्यारित या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. नव भारत साक्षरता अभियानात शाळा हे एकक मानण्यात आले आहे. त्यामुळे ज्या शाळेतून उल्लास ॲपवर प्रौढ निरक्षराची नाव नोंदणी करण्यात आली होती, ती शाळाच त्यांच्यासाठी परीक्षा केंद्र राहणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या प्रौढांना केंद्र सरकारतर्फे साक्षरतेचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रकही दिले जाणार आहे.

ही परीक्षा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत घेतली जाणार आहे. निरक्षर व्यक्ती या दरम्यान त्याच्या सोयीच्या वेळेनुसार येऊन तीन तासांचा पेपर देऊ शकणार आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जादा वेळ मिळणार आहे. उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरावा लागणार आहे. 

कोणत्या तालुक्यात किती प्रौढ निरक्षर?आर्णी : ८४६बाभूळगाव : ४२६दारव्हा : ३८२६दिग्रस : ४६घाटंजी : ६०४कळंब : १७७४महागाव : ६२७मारेगाव : ६३९नेर : ६२०पांढरकवडा : ६८७पुसद : २८१राळेगाव : २०७उमरखेड : १३१९वणी : ८९५यवतमाळ : २५९१झरी : ४८३

अशी असेल प्रश्नपत्रिकाप्रश्नपत्रिका एकूण १५० गुणांची असून ती पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित तीन भागांमध्ये विभागलेली असेल. भाग-क (वाचन) ५० गुण, भाग-ख (लेखन) ५० गुण, भाग-ग (संख्याज्ञान) ५० गुण अशी गुणविभागणी असेल. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के म्हणजे १७ गुण मिळविणे आवश्यक आहे. एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के म्हणजे ५१ गुण मिळविणे आवश्यक आहे.

सोळाही तालुक्यातील विविध शाळांवर एकंदर १५ हजार ८७१ निरक्षरांची नोंदणी करण्यात आली. तर जिल्ह्यातील ३२८ निरक्षरांनी स्वत: उल्लास ॲपवर नोंदणी केली आहे. परीक्षेचे साहित्य गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून केंद्रांवर पोहचविण्यात आले आहे. परीक्षेस येताना असाक्षर व्यक्तीने स्वतःचा फोटो, तसेच मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक यापैकी कोणतेही एक ओळखपत्र आणावे.- किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी (योजना), यवतमाळ

टॅग्स :Yavatmalयवतमाळ