शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
3
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
4
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
5
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
6
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
7
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
8
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
9
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
10
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
12
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
13
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
14
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
15
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
16
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
17
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
18
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
19
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
20
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

दिग्रसचा अरुणावती प्रकल्पच समस्याग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:34 PM

तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. यामुळे दिग्रससह परिसराचा विकास रखडला आहे. रस्त्यांची दैनावस्था झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देविकास रखडला : परिसरातील रस्त्यांची दैनावस्था, धरणावर जाण्याचे मार्ग खुंटले

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. यामुळे दिग्रससह परिसराचा विकास रखडला आहे. रस्त्यांची दैनावस्था झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.१५ दिवसांपूर्वी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे अरुणावती धरणात ९० टक्के जलसाठा झाला. पाण्याचा विसर्ग करण्यासाठी प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले होते. धरण भरल्यामुळे दिग्रससह परिसरातील नागरिकांनी प्रकल्पाकडे धाव घेतली. मात्र प्रकल्पाकडे जाण्यासाठी धड रस्ते नसल्याने अनेकांच्या आनंदावर विरजण पडले. शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर धानोरा येथे अरुणावती प्रकल्पाचे सुसज्ज कार्यालय उभारण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता डी.जे. राठोड यांना प्रकल्पाची दुर्र्दशा मात्र दिसून येत नाही.सावंगापासून चार किलोमीटर अंतरावर प्रकल्पाचे विश्रामगृह आहे. या विश्रामगृहाच्या दारे-खिडक्या, फर्निचर भरदिवसा चोरून नेले जात आहे. मात्र त्याकडे लक्ष देण्यास अधिकाऱ्यांना वेळ नाही. विश्रामगृहापासून प्रकल्पापर्यंतचा रस्ता प्रचंड दयनीय अवस्थेत आहे. या रस्त्याने मोठे वाहन तर सोडाच दुचाकी किंवा पायदळ चालणेही कठीण झाले आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमधील पाणी धरणाच्या भिंतीत मुरत आहे. त्यामुळे प्रकल्पालाच धोका निर्माण झाला आहे.याच धरणाच्या निर्मितीमुळे दिग्रस तालुक्यातील अनेक गावांचा दैनंदिन व्यवहार बाजूच्या दारव्हा आणि आर्णी शहराशी जोडला गेला आहे. त्यामुळे दिग्रस बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला. तथापि, धरणाला आकर्षक बनवून हे व्यवहार दिग्रसकडे आकर्षित केले जावू शकतात. मात्र त्यादृष्टीने कोणतेही प्रयत्न केले जात नाही. यामुळे तालुक्यातील नागरिकांत प्रचंड संताप आहे.पर्यटन म्हणून विकास व्हावाअरुणावती धरणाचा पर्यटन म्हणून विकास झाल्यास दिग्रस तालुक्याला सुगीचे दिवस येवू शकतात. या धरणात मत्स्य निर्मिती केंद्र स्थापन केल्यास लाभ होवू शकतो. तसेच बोटींची व्यवस्था केल्यास नजीकच्या गावांमध्ये सहज जाणे-येणे होवू शकते. तसेच या गावांचा शहराशी तुटलेला संपर्क पूर्ववत होवू शकतो. विश्रामगृहाची दुरुस्ती करून तेथे विविध सुविधा उपलब्ध केल्यास प्रकल्पाला लाभ होवू शकतो. धरण परिसर स्थळाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केल्यास गर्दी वाढून लाभ मिळू शकतो. याकडे अरुणावती प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.