लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाटंजी तालुक्यातील स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुरुवारी थेट संवाद साधला. स्वयंसहायता समूहाने महिलांच्या आर्थिक उन्नतीचा आधार व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे गत महिन्यात उमरखेड तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांशीही पंतप्रधानांनी थेट संवाद साधला होता.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत सूचना व विज्ञान केंद्रात बचत गटातील महिलांसोबत पंतप्रधानांनी थेट संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाटंजी तालुक्यातील कोळी बु. येथील रंजना वसंतराव कामडी या पशुसखीसोबत संवाद साधला. महिलांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले, कुटुंब आणि समाजाचे कल्याण महिलाशक्ती करू शकतात. चांगल्या कामातून महिलांनी आर्थिक प्रगती करावी, या यशस्वी महिलांच्या यशोगाथा चांगल्या विचारांनी ऐकून आत्मसात केल्यास देशाचे चित्र बदलेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.कोळी बु. येथील गजानन महाराज महिला स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्य रंजना यांनी शेती व शेळीपालन या व्यवसायासोबत पशुसखी म्हणून काम केले. यावेळी काम करतानाचे अनुभव आणि त्यातून साधलेली आर्थिक प्रगती याबाबतची माहिती पंतप्रधानांना दिली. शेळीच्या माध्यमातून मोठा व्यवसाय होऊ शकतो ही नवीन माहिती मिळाल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. तसेच शेळीला आजार झाल्यास कोणते उपचार करावे हे देखील पंतप्रधानांनी रंजना यांच्याकडून जाणून घेतले. यावेळी सूचना व विज्ञान केंद्रात मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.
पंतप्रधानांचा घाटंजीच्या महिलांशी थेट संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 10:00 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाटंजी तालुक्यातील स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुरुवारी थेट संवाद साधला. स्वयंसहायता समूहाने महिलांच्या आर्थिक उन्नतीचा आधार व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
ठळक मुद्देस्वयंसहायता समूह : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महिलांना केले मार्गदर्शन