शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
3
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
4
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
5
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
6
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
7
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
8
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
9
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
10
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
11
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
12
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
13
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
14
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
15
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
16
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
17
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
18
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
19
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
20
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा

तुमच्या शाळेतील सुविधांवर थेट हायकाेर्टाचा वाॅच, जिल्हा न्यायाधीशांची समिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 1:17 AM

जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महापालिकांकडून चालविल्या जाणाऱ्या शाळांची खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशावरून प्रत्येक जिल्ह्यात तपासणी मोहीम उघडण्यात आली आहे.

- अविनाश साबापुरे

यवतमाळ : राज्यातील शाळांच्या परिस्थितीबाबत जनसामान्यांमधून नेहमीच ओरड ऐकायला मिळते. मात्र, आता शाळांच्या दुरवस्थेची दखल थेट उच्च न्यायालयाने घेतली असून, प्रत्येक जिल्ह्यातील शाळांची तपासणी जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून केली जात आहे.

जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महापालिकांकडून चालविल्या जाणाऱ्या शाळांची खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशावरून प्रत्येक जिल्ह्यात तपासणी मोहीम उघडण्यात आली आहे. या तपासणी समितीमध्ये अध्यक्ष म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आहेत. तर माध्यमिक शिक्षणाधिकारी या समितीचे सदस्य सचिव आहेत. तसेच उपजिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा पोलिस उपअधीक्षक आदी सदस्य आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पुरेशा सोयीसुविधा आहेत की नाही, योग्य इमारत आहे की नाही, शाळेतील पिण्याच्या पाण्याची स्थिती, स्वच्छतागृहाची स्थिती, शाळेच्या परिसरात काही गैरप्रकार घडतात का, शाळेला कुंपण भिंत आहे का आदीबाबत ही समिती पाहणी करीत आहे. त्यासाठी न्यायाधीशांच्या समितीकडून शाळांना भेटी सुरू आहेत. चक्क न्यायाधीशांसह मोठ्या अधिकाऱ्यांचा ताफा शाळेत धडकल्याने शिक्षकांनाही आश्चर्य वाटत आहे.

छ. संभाजीनगर येथील शाळेची परिस्थिती पाहून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. त्यावरून केवळ छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर राज्यभरातील शाळांच्या स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश २१ जुलैला न्यायालयाने दिले. यासाठी जिल्हा न्यायाधीशांच्या नेतृत्वात प्रत्येक जिल्ह्यात समिती नेमण्यात आली आहे. आता या समितीकडून ६० दिवसांत सूचना आणि शिफारशींसह उच्च न्यायालयाला अहवाल सादर होणार आहे. त्यानंतर उच्च न्यायालय शाळांबाबत कोणते निर्देश देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तंबाखूप्रेमी, दारूड्यांना बसणार दणकानियमानुसार, शाळेच्या परिसरात दारू, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जाऊ शकत नाही. परंतु, अनेक ठिकाणी विपरीत स्थिती आहे. काही शाळांच्या मोकळ्या परिसरात रात्री विविध प्रकारची गैरकृत्ये चालतात. उच्च न्यायालयाने शाळा तपासणी समितीमध्ये पोलिस प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपासणीदरम्यान असा गैरप्रकार आढळताच कारवाई होणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालय