शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

निधी वाटपात होतोय भेदभाव विकासकामे करायची तरी कशी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 17:06 IST

जिल्हा नियोजन समिती : भाजप आमदार बोदकुरवार यांचा बैठकीत सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी दिला जातो. निधी वितरित होऊनही कामे पूर्ण न झाल्याने काही विभागांकडे पडून राहतो. जिल्हा परिषदेकडे दोन वर्षांपूर्वीचे २१ कोटी रुपये प्रलंबित आहेत. याबद्दल पालकमंत्री संजय राठोड यांनी नाराजी व्यक्त करीत जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला खडेबोल सुनावले. याप्रकरणी संबंधितांकडून खुलासा घेण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान सत्ताधारी भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विकास कामासाठी निधी वाटप करताना भेदभाव होत असल्याचा आरोप केल्याने ही बैठक गाजली.

नियोजन भवनात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ही बैठक पार पडली. बैठकीला खासदार संजय देशमुख, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार मदन येरावार, आमदार प्रा. डॉ. अशोक उईके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार इंद्रनील नाईक, आमदार नामदेव ससाने, आमदार डॉ. संदीप धुर्वे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक कुमार चिंता, सहायक जिल्हाधिकारी सुहास गाडे, लघिमा तिवारी, नियोजन उपायुक्त सुशील आगरेकर, जिल्ला नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर उपस्थित होते. जिल्हा परिषदेत प्रशासकराज असल्याने विभागप्रमुख निधी खर्ची करण्याकडे कानाडोळा करीत आहेत. यातून लोकप्रतिनिधींकडून निधी खेचून आणण्याचा प्रयत्नाला हरताळ फासला जातो. योजनेतून मंजूर निधी कोणत्याही परिस्थितीत अखर्चित राहता कामा नये.

विशेषतः जिल्हा परिषदेअंतर्गत यंत्रणांनी निधी वेळेत खर्च होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री राठोड यांनी दिले. गेले काही दिवस सतत पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनास पाठविण्यात आला आहे. लवकरच वाढीव दराने मदतनिधी जिल्ह्याला प्राप्त होईल. त्याचे वितरण लवकर केले जावे, अशी सूचना करण्यात आली. या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर निधी विभागांनी लवकरात लवकर खर्च करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. बैठकीला विशेष निमंत्रित सदस्य क्रांती राऊत, सदबाराव मोहटे, सीताराम ठाकरे, अब्दुल वहाब अब्दुल हलिम उपस्थित होते. 

दरम्यान या बैठकीत वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला समान निधीचे वाटप करण्याची गरज आहे. मात्र, निधी देताना भेदभाव होत असल्याचा आरोप केला. काही मतदारसंघात जास्तीचा निधी दिला जात आहे, तर काही मतदारसंघांना वंचित ठेवले जात असल्याबाबत त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. या तक्रारीची चर्चा बैठकीनंतरही अधिकारी, पदाधिकाऱ्यांत रंगल्याचे दिसून आले.

...तर दाखल करा विमा कंपनीविरुद्ध गुन्हामागील वर्षी पीकविमा घेतलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानीच्या सूचना देऊनही विमा कंपनीने त्यांना भरपाई देण्याचे नाकारले. जिल्हाधि- काऱ्यांनी सुनावणीत भरपाई देण्याचे आदेश दिले. तेच आदेश मंत्रालयात सचिवांनी कायम ठेवून भरपाईच्या सूचना केल्या. तरीही कंपनी टाळाटाळ करीत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली असता कंपनीला आठ दिवसांत नुकसाईभरपाई देण्याची नोटीस द्या. त्यानंतरही भरपाई न दिल्यास कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

बैठकीत आमदार बोदकुरवार काय म्हणाले?सन २०१३ मध्ये निघालेल्या शासन परिपत्रकानुसार लोकसंख्येच्या आधारावर जिल्हा विकास नियोजन निधीचे वितरण अपेक्षित आहे. परंतु गेल्या काही वर्षात हा निधी वाटप करताना दुजाभाव केला जात आहे. विशेषतः वणी, राळेगाव, केळापूर आणि उमरखेड या चार तालुक्यावर अन्याय केला जात असल्याची तोफ आमदार बोदकुरवार यांनी या बैठकीत डागली. विकासका- मांसाठी निधीच मिळणार नसेल तर कामे होणार कशी, असा प्रश्न करीत निधी वाटपात समतोल राखला जावा, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ