लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत मुंबई येथील बैठकीत घाटंजीतील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.या बैठकीत आमदार राजू तोडसाम यांनी आर्णी विधानसभा क्षेत्रातील समस्या उपस्थित केल्या. आर्णी तालुक्यातील मुकुंदपूर, कवठाबाजार, कोसदनी, साकूर येथील शेती अर्धपूस प्रकल्पात गेली. सिंचनाची व्यवस्था होणार असल्याने शेतकऱ्यांनी कवडी मोल दराने ही शेती शासनाला दिली. मात्र ३५ वर्षांचा कालावधी लोटूनही प्रकल्प पूर्ण झाला नसल्याचे आमदार तोडसाम यांनी निदर्शनास आणून दिले. प्रकल्प अधिकाºयांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यास असमर्थ असल्याचे शेतकºयांना कळविले. त्यामुळे शेतकºयांना त्यांच्या जमिनी परत करण्याची मागणी तोडसाम यांनी केली.घाटंजी तालुक्यातील वाघाडी नदी पुनर्जीवन कार्यक्रमाकरिता ९८५ कोटी रूपये मंजूर केल्याबद्दल तोडसाम यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या बैठकीला वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते, असे आमदार तोडसाम यांनी सांगितले.
घाटंजीतील समस्यांवर मुंबईत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 9:49 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत मुंबई येथील बैठकीत घाटंजीतील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
ठळक मुद्देमुख्यमंत्री उपस्थित : अहीर, तोडसाम यांनी माडल्या समस्या