शहरं
Join us  
Trending Stories
1
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
2
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
3
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
4
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
5
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
7
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
8
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
9
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
10
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
11
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
12
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
13
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
14
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
15
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
16
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
17
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
18
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
19
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
20
निवडणुकीचे सूर उमटले वाद्यांच्या बाजारात; उलाढाल वाढली, राज्यातील उमेदवारांची खरेदीसाठी धाव 

हद्दवाढ क्षेत्रात विदारक स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 9:57 PM

येथील नगरपरिषदेन लगतच्या सात ग्रामपंचायती समाविष्ट झाल्या. मात्र हद्दवाड क्षेत्रातील या भागाकडे पालिकेचे संपूर्णत: दुर्लक्ष होत आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या अनेक प्रभागात कचरा संकलनासाठी पालिकेची यंत्रणाच नाही.

ठळक मुद्देयवतमाळ नगर परिषद : कचरा उचलणारी यंत्रणाच पोहोचली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील नगरपरिषदेन लगतच्या सात ग्रामपंचायती समाविष्ट झाल्या. मात्र हद्दवाड क्षेत्रातील या भागाकडे पालिकेचे संपूर्णत: दुर्लक्ष होत आहे.नव्याने समाविष्ट झालेल्या अनेक प्रभागात कचरा संकलनासाठी पालिकेची यंत्रणाच नाही. भोसा, वडगाव, उमरसरा, लोहारा, मोहा, वाघापूर, पिंपळगाव येथील अनेक वस्त्यांमध्ये आजतागायत स्वच्छतेची यंत्रणा पोहोचली नाही. त्यामुळे परंपरागत पद्धतीने नागरिक घरासोमर कचरा जाळून नष्ट करतात. सुरूवातील ग्रामपंचायत म्हणून अस्तित्व असलेल्या भागात आता घंटागाडी बंद पडली आहे. शक्य होईल त्या ठिकाणी आठवड्यातून कधीतरी एकदा ट्रॅक्टर पोहोचतो. उर्वरित दिवस कचरा जागा मिळेल तेथे फेकला जातो.वाढीव क्षेत्रातील अनेक भागात रस्तेच नसल्याने पावसाळ््यात कोणतेच वाहन पोहोचत नाही. नगरपरिषदेतील जुन्या प्रभागांमध्ये हातगाडी व घंटागाडीचा पर्याय आहे. इतर ठिकाणी त्याचीही सोय नाही. रस्ते नसल्याने हातगाडी, घंटागाडी चालविणे शक्यच नाही.उमरसरा आणि वडगावमधील काही भाग हा उतारकड्याचा आहे. तेथूून कचरा काढण्यासाठी ट्रॅक्टरचीच आवश्यकता आहे. मात्र दहा ते १५ हजार लोकसंख्येच्या प्रभागात केवळ एका ट्रॅक्टरचे नियोजन आहे. शहराचे पाच झोनमध्ये विभाजन केले असून मध्यवर्ती भागातच आरोग्य विभागाची यंत्रणा दिसून येते. उर्वरित भागात अद्याप अतिशय विदारक स्थिती आहे. विकासाच्या गप्पा हाकणारे पुढारी शहरातील कचराही पूर्णपणे उचलून त्यावर प्रक्रिया करू शकत नाही, असे दुर्दैवी चित्र आहे.मोहा परिसरासह प्रभाग २४, २५, २६, २७ आणि २८ मध्ये घंटागाडी फिरणे बंद आहे. वाघापूरमधील प्रभाग १३ व १५ मध्ये ट्रॅक्टरने कचरा संकलन केले जात आहे. दरम्यान, नगरपरिषदेने ‘निगसर्गाकडून निसर्गाकडे’ संकल्पना राबवीत सेंद्रीय खत निर्मिती कुंड तयार केले होते. यातील केवळ संजय गांधी शाळा आणि पालिकेच्या दवाखान्यातील कुंड सध्या सुस्थितीत आहे. उर्वरित कुंड्यांमध्ये झुडपे उगवली असून निर्र्मिती केल्यानंतर त्या कुंड्यांकडे कुणीच फिरकले नाही. शहरातून दिवसाकाठी ७० मेट्रीक टन कचरा निघत असल्याचा दावा पालिका आरोग्य विभागाने केला. सहा मेट्रीक टनापासून गांडूळ खत तयार केले जाते. शहराच्या विविध भागातील वेस्ट त्यासाठी वापरले जाते.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ