लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आॅनलाईन बदली प्रक्रियेत विस्थापित झालेल्या महिला शिक्षिकांना अतिदृर्गम भागात नियुक्त्या देण्यात आल्या. त्याबाबत गुरुवारी उपोषण आंदोलनात शिक्षकांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, ६ जूनपासून तिरंगा चौकात सुरू असलेले बदलीग्रस्त शिक्षकांचे साखळी उपोषण दहाव्या दिवशीही प्रशासनाकडून बेदखल करण्यात आले.ज्या शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र जोडून सोयीच्या ठिकाणी बदल्या करून घेतल्या, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. खोटे प्रमाणपत्र जोडण्यासाठी स्थानिक प्रशासनच जबाबदार आहे. बोगसपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहे, असा आरोप करण्यात आला.आॅनलाईन बदली प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप झाला. त्यामुळे संपूर्ण बदली प्रक्रिया नव्याने करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. जिल्हा परिषदेत तक्रारींचा खच पडला असून त्यावर कारवाई कधी होणार याकडे बदलीग्रस्त शिक्षकांचे लक्ष लागले आहे. कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बदलीग्रस्त शिक्षक संघर्ष समितीने दिला आहे.
विस्थापित महिलांना दुर्गम भागात बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:09 PM
आॅनलाईन बदली प्रक्रियेत विस्थापित झालेल्या महिला शिक्षिकांना अतिदृर्गम भागात नियुक्त्या देण्यात आल्या. त्याबाबत गुरुवारी उपोषण आंदोलनात शिक्षकांनी संताप व्यक्त केला.
ठळक मुद्देबदलीग्रस्तांचा संताप : शिक्षकांचे उपोषण दहाव्या दिवशीही बेदखल