लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : येथील वीज वितरण कंपनीचा कारभार अतिशय ढेपाळला आहे. थोडाही पाऊस, वारा आला की वीजपुरवठा बंद होतो. शुक्रवारी रात्रीपासून सलग १८ तास वीज बंद होती. याचा जाब नागरिकांनी विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारुन रोष व्यक्त केला.मागील काही दिवसांपासून अचानक विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. बºयाचदा काही भागातील विद्युत पुरवठा तातडीने सुरळीत केला जात नाही. नागरिकांच्या विद्युत विभागाशी असलेल्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. वीज बिल वेळेवर दिले जात नाही. त्यामुळे दंडाच्या रकमेचा भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामळे नागरिक पुरते हैराण झाले आहे.शुक्रवारी रात्रीपासून विद्युत खंडित होती. त्यामुळे नागरिकांनी आपला मोर्चा कंपनीच्या कार्यालयाकडे वळविला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने ठाणेदार विजय राठोड यांनी सर्व सूत्र आपल्या हातात घेतले. जमावाला शांत करुन बोलणी करण्यासाठी सर्वांना ठाण्यात पाचारण केले. याठिकाणी विद्युत कंपनीचे उपअभियंता गुर्जर व कनिष्ठ अभियंता भोयर यांना बोलावण्यात आले. येथूनच त्यांनी अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांच्याशी संपर्क करून लोकांच्या भावना त्यांच्या कानावर टाकल्या. समस्या न सुटल्यास कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याचीही त्यांना माहिती देण्यात आली.विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार येत्या ८ तारखेपर्यंत न थांबल्यास विद्युत कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. विद्युत कंपनीच्या अधिकाºयांकडून नागरिकांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये रोष व्यक्त केला जात होता. अनेक तक्रारींवर तोडगा काढला जात नसल्याची ओरड यावेळी करण्यात आली. थोड्याशा कारणावरून वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार थांबविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली. वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार वाढल्याचे सांगितले. यावेळी प्रमोद उरकुडे, राजाभाऊ तांबेकर, अब्दुल अजीज, रूपेश राऊत, मुन्ना लाखीयाँ, प्रवीण निमकर, रूपेश सुचक, अनिल दुद्दलवार, विशाल हजारे, नितीन ठाकरे, अतिफ, हबीब, गोलू तिवाडे आदी उपस्थित होते.ग्राहकांच्या तक्रारींकडे केले जाते दुर्लक्षविद्युत कंपनीच्या कळंब येथील कार्यालयात नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे. वैयक्तिक स्वरूपातील कुठल्याही तक्रारींची दखल घेतली जात नाही. शेतकºयांच्या विजेविषयीच्या समस्याही प्रलंबित ठेवल्या जातात. कित्येक महिने तक्रारींचे फाईल निकाली काढले जात नसल्याची ओरड आहे.
सलग १८ तास वीज बंदने कळंबमध्ये असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 9:42 PM
येथील वीज वितरण कंपनीचा कारभार अतिशय ढेपाळला आहे. थोडाही पाऊस, वारा आला की वीजपुरवठा बंद होतो. शुक्रवारी रात्रीपासून सलग १८ तास वीज बंद होती. याचा जाब नागरिकांनी विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारुन रोष व्यक्त केला.
ठळक मुद्देसंडे अँकर । विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर, वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले