शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

जिल्हा बँक ३९ टक्के, राष्ट्रीयीकृत ११ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 5:00 AM

२०२०-२१ च्या खरीप हंगामासाठी आतापर्यंत एकूण ३२० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप झाले आहे. त्यात जिल्हा बँकेचा वाटा २१६ कोटी रुपयांचा असून ही टक्केवारी ३९ एवढी आहे. शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ५४८ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट निश्चित करून दिले. सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना १५०० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले असले तरी आतापर्यंत या बँकांचे वाटप अवघे १०४ कोटींच्या घरात आहे.

ठळक मुद्देखरीप पीक कर्ज वाटप : हजारो शेतकरी प्रतीक्षेतच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पीक कर्ज वाटपातील राष्ट्रीयीकृत बँकांची संथगती यावर्षीही कायम आहे. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दीड महिन्यातच ३९ टक्क्यांवर पोहोचली असताना राष्ट्रीयीकृत बँका मात्र जेमतेम ८ ते ११ टक्क्यातच खेळत आहे.२०२०-२१ च्या खरीप हंगामासाठी आतापर्यंत एकूण ३२० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप झाले आहे. त्यात जिल्हा बँकेचा वाटा २१६ कोटी रुपयांचा असून ही टक्केवारी ३९ एवढी आहे. शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ५४८ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट निश्चित करून दिले. सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना १५०० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले असले तरी आतापर्यंत या बँकांचे वाटप अवघे १०४ कोटींच्या घरात आहे. त्यांची ही टक्केवारी ८ ते ११ अशी असून गती संथ आहे.राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना सहजासहजी कर्ज देत नाही, ही जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांची दरवर्षीचीच ओरड आहे. त्यात तेवढेच तथ्यही आहे. अनेक गावांना राष्ट्रीयीकृत बँकांशी जोडले गेल्याने त्यांचा नाईलाज आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यक्षेत्रात येणाºया शेतकºयांना मात्र सहज कर्ज उपलब्ध होते. जुन्या सरकारमधील छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतील एकट्या जिल्हा बँकेशी संबंधित ३० हजार शेतकरी माफीपासून वंचित आहे. दीड लाखांची माफी, त्यावरील रक्कम भरा अशी ही योजना होती.संचालक मंडळाची बैठकजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची ८ मे रोजी बैठक पार पडली. यात अनेक विषय मार्गी लावले गेले. बँकेच्या सुरक्षा एजंसीला वर्षभर मुदतवाढ देण्यात आली. कारण सध्या निविदा प्रक्रिया राबविता येत नाही. खर्चाला मान्यता देणे व अन्य काही विषय मंजूर करण्यात आले. संचालक मंडळाची दुसरी बैठक लवकरच होणार असल्याचे सांगण्यात आले.माफीपासूून वंचितांनाही पीककर्जमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने जाहीर केलेल्या ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेत शेतकºयांना सरसकट दीड लाखापर्यंंतचे कर्जमाफ केले गेले. परंतु यवतमाळसह काही जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका असल्याने शासनाकडून माफीचा पैसाच आला नाही. जिल्ह्याची माफीची ही रक्कम ६५० कोटी रुपये एवढी असून शेतकरी लाभार्थ्यांची संख्या ५८ हजार आहे. त्यात १८ हजार जिल्हा बँकेचे तर ४० हजार राष्ट्रीयीकृत बँकांचे सभासद आहेत. या माफीपोटी जिल्हा बँकेला १३७ कोटी तर राष्ट्रीयीकृत बँकांना सुमारे ५०० कोटी रुपयांची प्रतीक्षा आहे. माफीची ही रक्कम प्राप्त न झाल्याने संबंधित ५८ हजार शेतकरी यावर्षीच्या पीक कर्जापासून वंचित आहे. मात्र गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी व्हीसीमध्ये माफी न मिळालेल्यांनाही कर्ज देण्याची घोषणा केल्याने या शेतकºयांचा कर्जाचा मार्ग सुकर झाला आहे.

टॅग्स :bankबँक