शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

जिल्हा बँकेच्या सीईओंना सहनिबंधकांकडून ३१ ला समक्ष पाचारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 5:00 AM

विभागीय सहनिबंधकांनी दोन-तीन मुद्यांवर माहिती मागितली आहे. त्यात आर्णी शाखेतील गैरव्यवहाराबाबत अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल मागण्यात आला आहे. मात्र, बँकेने अद्याप अंतर्गत ऑडिट केले नसल्याची माहिती आहे. थेट त्रयस्थ ‘सीए’चीच नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे सीएंचा प्राथमिक अहवाल सादर केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नोकरभरती हा प्रमुख मुद्दा सहनिबंधकांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देआर्णी शाखेतील कोट्यवधींचा गैरव्यवहार : अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल मागितला; नोकरभरतीवरही होणार चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्णी शाखेतील गाजत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणाची अमरावतीचे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) राजेश दाभेराव यांनी दखल घेतली आहे. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बुधवारी (दि. ३१ मार्च) दुपारी १२ वाजता समक्ष हजर राहण्याचे आदेश २३ मार्च रोजी जारी केले आहे. विभागीय सहनिबंधकांनी दोन-तीन मुद्यांवर माहिती मागितली आहे. त्यात आर्णी शाखेतील गैरव्यवहाराबाबत अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल मागण्यात आला आहे. मात्र, बँकेने अद्याप अंतर्गत ऑडिट केले नसल्याची माहिती आहे. थेट त्रयस्थ ‘सीए’चीच नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे सीएंचा प्राथमिक अहवाल सादर केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नोकरभरती हा प्रमुख मुद्दा सहनिबंधकांनी उपस्थित केला आहे. बँकेने नोकरभरती प्रक्रिया राबविली, त्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे या भरतीचा सद्य:स्थितीदर्शक अहवाल मागण्यात आला आहे. शिवाय कंत्राटी पदाच्या भरतीकरिता ३ मार्च रोजी जाहिरात दिली गेली, त्याचीही माहिती मागितली गेली आहे. लिपिक व शिपायाच्या १०५ जागांची अंतिम निवड यादी, मागासवर्गीयांच्या ४२ जागांच्या भरती प्रक्रियेसाठी एजन्सी नेमणे आणि दीडशेपेक्षा अधिक कंत्राटी पदांच्या भरतीच्या अनुषंगाने सीईओंना आपला अहवाल सहनिबंधकांना सादर करावा लागणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाची आज बैठक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज, शुक्रवारी (दि. २६) होत आहे. या बैठकीकडे भरतीतील उमेदवार व त्यांच्या पालकांच्या नजरा लागल्या आहेत. १०५ जागांची अंतिम निवड यादी जारी करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. मात्र, या भरतीला ब्रेक लावता येतो का याची अखेरची चाचपणी करण्यासाठी जिल्हा बँकेच्या पाच संचालकांनी नुकतीच नागपूरवारी केल्याची माहिती आहे. शुक्रवारच्या बैठकीत ठोस काही निर्णय होतो, की यादी आणखी लांबणीवर पडते याकडे नजरा आहेत. ४ एप्रिलपूर्वी ही यादी जाहीर होणे अपेक्षित आहे. कारण बँकेने तशी हमी उच्च न्यायालयात दिली आहे. 

आरोपींची अटक आणखी किती दिवस टळणार आर्णी : जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेतील कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. आर्णी पोलिसांनी या अटकेसाठी फारसा इन्टरेस्ट दाखविला नाही. या प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. अटक टाळण्यासाठी आरोपींनी प्रयत्न चालविले आहेत. अटकपूर्व जामिनासाठीही चाचपणी केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखा आरोपींना आणखी किती दिवस मोकळे फिरू देते याकडे आर्णीतील फसवणूक झालेल्या खातेदारांच्या नजरा लागल्या आहेत. आरोपी गावातच फिरत असताना आणि मोबाईलद्वारे त्यांचे लोकेशन घेणे शक्य असताना अटकेला विलंब का याचे रहस्य उलगडलेले नाही.

 

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी