लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीसाठी घ्यावयाच्या आॅनलाईन परीक्षेकरिता तारखांची जुळवाजुळव सुरू आहे. १५ जूननंतर ही परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिकाच्या १३३ व शिपायाच्या १४ अशा १४७ जागांसाठी नोकरभरती घेतली जात आहे. त्यासाठी आॅनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. अमरावती येथील खासगी एजंसीला नोकरभरतीचे हे कंत्राट देण्यात आले आहे. आॅनलाईन परीक्षेसाठी अधिकाधिक संगणक असलेल्या केंद्रांचा शोध एजंसीकडून घेतला जात आहे. सध्या यवतमाळात साडेचारशे पेक्षा अधिक संगणक उपलब्ध असलेल्या केंद्रावर जोर दिला जात आहे. अशा वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा होणार आहे. १४७ जागांसाठी सात हजारांवर उमेदवारांनी अर्ज केले आहे. ते पाहता लिपिकाच्या आॅनलाईन परीक्षेसाठी किमान तीन दिवस तर शिपायासाठी एक दिवस लागणार आहे. सध्या तारखांची जुळवाजुळव एजंसीकडून सुरू आहे. तरीही १५ जूननंतर परीक्षांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्हा बँक नोकरभरती पारदर्शक होणार असल्याचे सांगितले गेले असले तरी अनेक संचालक मात्र अद्याप आशावादी आहेत. त्यांची ‘सक्षम’ उमेदवार शोध मोहीम सुरूच आहे. ‘अॅप्रोच’ होणाऱ्या उमेदवारांचेही ते उत्स्फूर्तपणे स्वागत करीत आहे. एखादवेळी संचालकांंना ‘कोेटा’ मिळू शकतो मात्र प्रत्यक्षात अॅप्रोच झालेल्या उमेदवारांची संख्या या ‘कोट्या’च्या कितीतरी पटीने अधिक झाली असल्याचे सांगितले जाते. आॅनलाईन परीक्षा झाल्यानंतर पात्र ठरणाºया ‘सक्षम’ उमेदवारांमधून ‘कोटा’ काढण्याचा छुपा अजेंडा बँकेत ठरला असल्याचीही चर्चा आहे. आता परीक्षेपूर्वी ऐवजी ‘परीक्षेनंतर’ असा पवित्रा घेऊन संचालक आपला बचाव करीत नोकरभरतीत आपले ध्येय साध्य करणार असल्याचे कळते.आधी यवतमाळ, नंतर सांगलीयवतमाळ जिल्हा बँक नोकरभरतीचा कंत्राट मिळालेल्या एजंसीकडे सांगली जिल्हा बँकेच्याही भरतीची जबाबदारी आहे. परंतु तेथेसुद्धा आॅनलाईन परीक्षेसाठी संगणक उपलब्ध होत नसल्याची माहिती आहे. शासनाच्या आॅनलाईन परीक्षा त्यासाठी कारणीभूत ठरल्या आहे. म्हणूनच आधी यवतमाळची भरती व नंतर सांगलीची असे एजंसीने ठरविल्याचे सांगितले जाते.
जिल्हा बँकेची आॅनलाईन परीक्षा १५ जूननंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 9:00 PM
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीसाठी घ्यावयाच्या आॅनलाईन परीक्षेकरिता तारखांची जुळवाजुळव सुरू आहे. १५ जूननंतर ही परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिकाच्या १३३ व शिपायाच्या १४ अशा १४७ जागांसाठी नोकरभरती घेतली जात आहे.
ठळक मुद्देनोकरभरती : तारखांची जुळवाजुळव, संगणक उपलब्धतेची अडचण