लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी शुक्रवारी सिंगद येथील रोपवाटिकेला भेट दिली.तालुक्यातील सिंगद येथे वन विभागातर्फे नरेगाच्या माध्यमातून मध्यवर्ती रोप वाटिका तयार करण्यात आली आहे. या रोपवाटिकेत आत्तापर्यंत ५० हजार मोठी रोपे तयार झाली. १८ महिन्यात एक लाख रोपटे व नऊ महिन्यात १८ विविध प्रजातींची रोपे तयार करण्यात आली. या रोपवाटिकेला भेट देऊन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी वन विभागाचे कौतुक केले. तालुक्यातील शेतकरी आणि इतर नागरिकांकरिता या रोपवाटिकेत सागाची रोपे तयार करण्यात आली आहे. ही रोपे आधुनिक पद्धतीने प्रथमत:च रूट ट्रेनर पद्धतीने तयार करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीप्रसंगी पुसदचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, वन परिक्षेत्र अधिकारी ए.आर. धोत्रे, नाईक आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांची सिंगदला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:43 PM
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी शुक्रवारी सिंगद येथील रोपवाटिकेला भेट दिली. तालुक्यातील सिंगद येथे वन विभागातर्फे नरेगाच्या माध्यमातून मध्यवर्ती रोप वाटिका तयार करण्यात आली आहे.
ठळक मुद्देदिग्रस : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी शुक्रवारी सिंगद येथील रोपवाटिकेला भेट दिली.