शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

जिल्ह्यात १९ हजार मतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 10:33 PM

लोकसभा निवडणूक होताच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. त्यामुळे मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या विशेष मोहिमेत जिल्ह्यात १९ हजार मतदार वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील मतदारांची संख्या २० लाख ५७ हजारांवर पोहोचली आहे.

ठळक मुद्देदिग्रस विधानसभेत सर्वाधिक : जिल्ह्यात २० लाख ५७ हजार मतदार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभा निवडणूक होताच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. त्यामुळे मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या विशेष मोहिमेत जिल्ह्यात १९ हजार मतदार वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील मतदारांची संख्या २० लाख ५७ हजारांवर पोहोचली आहे.निवडणूक विभागाने मतदारांच्या नोंदणीसाठी मतदार नोंदणी अभियान राबविले. या अभियानात नवोदित मतदारांसोबत सुटलेल्या मतदारांची नावे नोंदविण्यात आली. जिल्ह्यात एकूण १९ हजार ७५० मतदारांची नावे नव्याने मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. यापूर्वी जिल्ह्यात २० लाख ३८ हजार मतदार होते. आता त्यात १९ हजार ७५० मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मतदारांचा आकडा २० लाख ५७ हजार ७५० वर पोहोचला आहे.नवीन नोंदणी झालेल्यांमध्ये नऊ हजार ९४२ पुरुष, तर नऊ ९ हजार ८०८ महिला मतदारांचा समावेश आहे. यात सर्वाधिक चार हजार ५९ हजार मतदार दिग्रस विधानसभा क्षेत्रात वाढले आहे.वणी विधानसभा क्षेत्रात तीन हजार १२४, राळेगाव विधानसभा क्षेत्रात दोन हजार ५१७ मतदार वाढले. यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये दोन हजार ७८० मतदार वाढले. यात एक हजार ५०६ पुरुष, तर एक हजार २७४ महिलांचा समावेश आहे. आर्णी विधानसभा क्षेत्रात दोन हजार ६०३ मतदार वाढले असून त्यात एक हजार १६५ पुरुष, तर एक हजार ४३८ महिलांचा समावेश आहे. पुसद विधानसभा क्षेत्रामध्ये दोन हजार ९४३ मतदार वाढले. त्यात एक हजार ६२६ पुरुष, तर एक हजार ३१७ महिला आहे. उमरखेड विधानसभा क्षेत्रात एक हजार ७२४ नवीन मतदार वाढले असून त्यात ७९१ पुरुष, तर ९३३ महिलांचा समावेश आहे.निवडणुकीवर नवोदित मतदारांचा प्रभावमतदार नोंदणी अभियानात १९ हजार ७५० मतदार वाढले. यामध्ये युवा मतदारांचा आकडा मोठा आहे. पूर्वीचे युवा मतदार आणि नवोदित मतदारांमुळे युवकांचा आकडा वाढला. यामुळे निवडणुकीवर त्यांचा प्रभाव राहणार आहे. त्यांच्या दृष्टीने उमेदवार आणि पक्षांना कार्यक्रम, योजना जाहीर कराव्या लागणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक