शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

जिल्ह्यात ४०२ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 10:11 PM

जिल्ह्याकडे पाठ फिरविलेल्या पावसाने शनिवारी सर्वदूर हजेरी लावून पोळ्यापूर्वी शेतकºयांना दिलासा दिला. शनिवारी ३१ मिलीमीटर पाऊस पडल्याने जिल्ह्यात आत्तापर्यंत ४०२ मिमी पावसाची नोंद झाली.

ठळक मुद्देशनिवारी ३१ मिमी : पोळ्यापूर्वी शेतकºयांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याकडे पाठ फिरविलेल्या पावसाने शनिवारी सर्वदूर हजेरी लावून पोळ्यापूर्वी शेतकºयांना दिलासा दिला. शनिवारी ३१ मिलीमीटर पाऊस पडल्याने जिल्ह्यात आत्तापर्यंत ४०२ मिमी पावसाची नोंद झाली.यवतमाळ जिल्हा हमखास पाऊस बरसणाºया प्रांतात येतो. मात्र यावर्षी वरूण राजाने जिल्ह्याकडे पाठ फिरविली आहे. गेल्या अडीच महिन्यात खंडित स्वरूपात पाऊस पडला. यात गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने पुन्हा डोळ्यात अश्रू आणले. पावसाअभावी खरिपातील पिकेही माना टाकू लागली. मात्र शुक्रवारी व शनिवारी जिल्ह्यात पाऊस परतल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला. शुक्रवारी ८ मिमी, शनिवारी ३१. ३७ मिमी पावसाची नोंद झाली. या हंगामातील शनिवार हा पावसासाठी सर्वात श्रीमंत वार ठरला. दोन दिवसांच्या पावसाने खरीप पिकांना तारले आहे. मात्र नदी आणि नाल्यांना अद्यापही मोठे पूर गेले नाही. यामुळे जलप्रकल्पांची स्थिती अद्याप चिंताजनक आहे. वेधशाळेने येत्या बुधवारपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. वेधशाळेचा अंदाज तंतोतंत खरा ठरल्यास जिल्ह्यातील जलप्रकल्प काही अंशी भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.असा बरसला पाऊसयावर्षी आतापर्यंत ४०२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात यवतमाळ तालुक्यात २४, बाभूळगाव ४२, आर्णी २८, कळंब १४, दारव्हा १७, दिग्रस ३८, नेर ३३, पुसद ४१, उमरखेड ४३, महागाव ५२, केळापूर २८, घाटंजी ८, राळेगाव १७, वणी ४४, मारेगाव ३५ आणि झरीमध्ये ३६ मिमी पावसाची नोंद झाली. महागाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. खरिपाची पिके या पावसाने तरतील, मात्र जोरदार पाऊस न झाल्यास रबी हंगाम अडचणीत येणार आहे.निळोणाला दमदार पावसाची प्रतीक्षाचशहराला पाणी पुरवठा करणाºया निळोणा जलाशयात आत्तापर्यंत १२६२.२ इंच जलसाठा झाला आहे. आणखी १२ फूट पाण्याचा संचय झाल्यानंतर हा प्रकल्प ओव्हर फ्लो होणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया निळोणाची क्षमता १२७४ फुटांची आहे. गेल्या दोन दिवसांत या प्रकल्पात ६ इंच पाणी वाढले.