लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यतील सिंचन प्रकल्पांतून पूर्ण क्षमतेने सिंचन होत नाही. आता जलाशयातील पाणी शेताच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कालवे, वितरिकांची डागडुजी केली जाणार आहे. त्याकरिता शासनाने जिल्ह्याला १३२ कोटी रूपये मंजूर केले असून या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २४ जानेवारीला घारफळ येथे करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी पत्रपरिषदेत सांगितले.जिल्ह्यातील उपलब्ध पाणी साठ्यातून किमान २१.६५ टक्के सिंचन अपेक्षित आहे. प्रत्यक्षात केवळ १२.६० टक्केच सिंचन होत आहे. प्रकल्प पूर्ण होऊनही कालवे व वितरिकांची दुरूस्ती नाही, अनेक कालवे अर्धवट आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एक मध्यम व १४ लघु प्रकल्पांच्या सिंंचन वृद्धीचे काम केले जाणसल्याचे ना. येरावार यांनी सांगितले.जलाशयांतून कालवा व वितरिकांच्या सहायाने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. कालवे देखभाल दुरूस्तीसाठी सिंचन विभागाला पोकलँड, टिप्पर व तत्सम मशीनरी खरेदी केली जाणार आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने सिंचन व्हावे, यावर भर दिला जात आहे. ६० वर्ष पूर्ण होऊन अद्याप प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेवटच्या टोकावर पाणी पोहोचलेले नाही, असा आरोप ना. येरावार यांनी केला. आता प्रत्यक्ष सिंचन वाढविण्यासाठी जलसंजीवनी योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला आमदार डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष आदी उपस्थित होते.बळीराजा जलसंजीवनीचे प्रकल्पबळीराजा जलसंजीवनी योजनेतून वर्धा बॅरेज (बाभूळगाव), या मध्यम प्रकल्पासह अमडापूर (उमरखेड), अंतरगाव (दारव्हा), दहेगाव (राळेगाव), हटवांजरी (मारेगाव), मनपूर (यवतमाळ), खर्डा (बाभूळगाव), कोची-आंबेझरी (घाटंजी), कोहळा (नेर), लखमापूर (यवतमाळ), महादापूर (झरीजामणी), महागाव (दारव्हा), पाचपहूर (झरीजामणी), डिगडोह (राळेगाव), वरूड-येवती (यवतमाळ) या लघु प्रकल्पांची दुरुस्ती केली जाणार आहे. या प्रकल्प्पांतून वाढीव १८ हजार ८८१ हेक्टरचे सिंचन होणार आहे. त्यासाठी बाभूळगाव तालुक्यातील घारफळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कें्रदीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर भूमिपूजनला येणार आहे.
जिल्ह्याला सिंचनासाठी मंजूर झाले १३२ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 10:12 PM
जिल्ह्यतील सिंचन प्रकल्पांतून पूर्ण क्षमतेने सिंचन होत नाही. आता जलाशयातील पाणी शेताच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कालवे, वितरिकांची डागडुजी केली जाणार आहे.
ठळक मुद्देमदन येरावार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी करणार भूमिपूजन