पुसद : अखिल भारतीय ग्राहक पंचायतची जिल्हा बैठक उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष डाॅ. नारायण मेहरे होते.
बैठकीचे उद्घाटन विदर्भ प्रांताध्यक्ष ॲड. स्मिता देशपांडे यांनी केले.
याप्रसंगी ॲड. स्मिता देशपांडे यांनी संघटनात्मक बाबीवर चर्चा करून नंतर नवीन ग्राहक संरक्षण कायदा २०१९ हा पूर्वीच्या कायद्यापेक्षा ग्राहकांच्या अधिक हिताचा कसा आहे, याबाबत उद्बोधन केले. प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे यांनी ग्राहकांच्या समस्या जाणून त्यांना संघटित करण्यावर भर दिला. डाॅ. नारायण मेहरे यांनी ग्राहकांनी संघटित होऊन जागृत झाल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.
दुसऱ्या सत्राचे प्रास्ताविक जिल्हा सचिव प्रा. केशव चेटुले, अहवाल वाचन शहर सचिव शेखर बंड, तर संचालन शहराध्यक्ष ॲड. राजेश पोहरे यांनी केले. आभार भाऊ बंगाले यांनी मानले. सुरुवातीला स्वामी विवेकानंद व अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत बिंदूमाधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर संजय जोशी यांच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. बैठकीला ग्राहक पंचायत जिल्हा व शहर कार्यकारिणी सदस्य, प्रांत सचिव संजय धर्माधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष डाॅ. वर्मा, ॲड. ताई दाते, जिल्ह्यातील १३ तालुक्यांचे अध्यक्ष, सचिव, संघटन मंत्री उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी जिल्हा संघटनमंत्री हितेश शेठ, राजू कठाळे, भासू बंगाले आदींनी परिश्रम घेतले.