लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गॅसधारकांना केरोसिन न पुरविण्याच्या सूचना आहेत. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. यामुळे पावणे सहा लाख कार्डधारकांचे केरोसिन ब्लॉक करण्यात आले आहे. या कार्डधारकांना पुढील काळात केरोसिन पाहिजे असल्यास शुभ्र केरोसिन खरेदी करावे लागणार आहे. शुभ्र केरोसिनचे दर गरीब कुटुंबाला परवडणारे नाही. यामुळे त्यांची चूल पेटणार कशी, असा गंभीर प्रश्न आहे.संपूर्ण जिल्ह्यात सहा लाख ३७ हजार रेशनकार्डधारक आहेत. यातील पाच लाख ३७ हजार रेशनकार्डधारकांनी स्वत:चा गॅस खरेदी केला. शासकीय धोरणानुसार अशा कार्डधारकांना केरोसिन न देण्याचे आदेश आहे. अशा कार्डधारकांचे केरोसिन पुरवठा विभागाने बंद केले आहे. यामुळे भविष्यात अशा कार्डधारकांना केरोसिन मिळणार नाही. अशा ग्राहकांना भविष्यात शुभ्र रेशन दिले जाणार आहे. या केरोसिनचा दर ७२ रुपये लिटर राहणार आहे. अनुदानाच्या दरात मिळणाऱ्या राशनचा दर २८ रुपये आहे. या दोन्ही दरात प्रचंड तफावत आहे. यामुळे गरिबांच्या घरात चूल पेटणार नाही.६० हजार ग्राहकांकडे अजूनही गॅस नाहीजिल्ह्यातील ६० हजार कार्डधारकांकडे गॅस नाही. अशा कार्डधारकांसाठी जिल्ह्यात केरोसिन पाठविले जात आहे. सहा टँकरच्या माध्यमातून या केरोसिनचे वाटप होत आहे. असे असले तरी ते ६० हजार ग्राहक शून्य करण्यात यावे यासाठी वरिष्ठ पातळीवरील हालचाली सुरू झाल्या आहेत. ६० हजार ग्राहक शून्य झाल्यास संपूर्ण जिल्हा केरोसिनमुक्त होईल. यामुळे जिल्ह्यात अनुदानावरील केरोसिन पाहायलाही मिळणार नाही.
जिल्ह्यात पावणेसहा लाख ग्राहकांचे केरोसीन ‘ब्लॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 11:44 PM
गॅसधारकांना केरोसिन न पुरविण्याच्या सूचना आहेत. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. यामुळे पावणे सहा लाख कार्डधारकांचे केरोसिन ब्लॉक करण्यात आले आहे. या कार्डधारकांना पुढील काळात केरोसिन पाहिजे असल्यास शुभ्र केरोसिन खरेदी करावे लागणार आहे.
ठळक मुद्देगॅस पोहोचणे अवघड : ‘शुभ्र’ची किंमत गरिबांच्या अवाक्याबाहेर