शहरं
Join us  
Trending Stories
1
Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?
2
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
3
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
4
UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...
5
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी
7
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
8
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
9
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
10
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
11
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
12
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
13
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
14
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
15
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
16
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
17
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
18
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
19
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी
20
शेकडो कर्मचाऱ्यांसाठी रतन टाटा बनले संकटमोचक; नोकरीवरुन काढण्याची नोटीस घेतली मागे

जिल्हा क्रीडा संकुलाचा कायापालट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 9:52 PM

जिल्हा क्रीडा संकुलाचा लवकरच कायापालट होणार आहे. तब्बल साडेआठ कोटी रुपयांची क्रीडा विकास कामे हाती घेतली जाणार आहे. यात प्रामुख्याने दोन मजली बहुद्देशीय हॉल, सिंथेटिक लॉन, टेनिस कोर्ट, जॉगिंग ट्रॅक, बॅडमिंटन व टेबल टेनिस हॉलचे अत्याधुनिक स्वरूपात नूतनिकरण आदी कामांचा समावेश राहणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देसाडेआठ कोटींची कामे : बहुद्देशीय हॉल, सिंथेटिक लॉन टेनिस कोर्ट

नीलेश भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा क्रीडा संकुलाचा लवकरच कायापालट होणार आहे. तब्बल साडेआठ कोटी रुपयांची क्रीडा विकास कामे हाती घेतली जाणार आहे. यात प्रामुख्याने दोन मजली बहुद्देशीय हॉल, सिंथेटिक लॉन, टेनिस कोर्ट, जॉगिंग ट्रॅक, बॅडमिंटन व टेबल टेनिस हॉलचे अत्याधुनिक स्वरूपात नूतनिकरण आदी कामांचा समावेश राहणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी ‘लोकमत’ला दिली.जिल्ह्यातील सर्व खेळाडूंसाठी गोधणी रोडवरील नेहरू स्टेडियम येथे सध्या हक्काचे क्रीडा संकुल आहे. शहरात क्रीडांगणाची वानवा असल्याने जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडू, नागरिकांची गर्दी असते. सध्या येथे बॅडमिंटन हॉल, टेबलटेनिस हॉल, हॅन्डबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, क्रीडांगणे, स्केटींग, लॉन टेनिस कोर्ट, व्यायाम शाळा इत्यादी क्रीडा सुविधा आहेत. तसेच येथे साडेसहा कोटी रुपयांचे अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅकचे कामही सुरू आहे.८० ते ९० खेळ व खेळाडूंची वाढती संख्या लक्षात घेता क्रीडा संकुलातील या क्रीडा सुविधाही अपूऱ्या पडत होत्या. आता साडेआठ कोटींच्या क्रीडा विकास कामाने खेळाडूंची ही गरज बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे.जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलच्या बाजूला तीन कोटी ६५ लाख रुपयांचा दोन मजली बहुद्देशीय हॉल उभारला जाणार आहे. यात इनडोअर गेम, स्क्वॅश कोर्ट, चार बॅडमिंटन कोर्ट, जिम व विविध क्रीडांगणाचा समावेश राहील. सिंथेटिक ट्रॅकच्या मधल्या भागात फुटबॉल ग्राऊंड राहणार आहे. फुटबॉल पोलच्या मागे असणारी मोकळी जागा सिंथेटिक फ्लोरिंग करून तिथे खो-खो, कबड्डी, थ्रोविंग इव्हेंट आदी क्रीडांगणे तयार होणार आहे. सिंथेटिक ट्रॅकच्या भोवताल जॉगिंग ट्रॅक तयार होईल. जेणे करून पायदळ फिरणाºया नागरिक खेळाडूंची सोय होईल. यासर्व कामांवर तब्बल तीन कोटी ३१ लाख रुपये खर्च होणार आहे. सध्या नेहरू स्टेडियमवर असलेल्या लॉन टेनिस कोर्टवर सिंथेटिक कव्हर लावले जाणार आहे. हॅडबॉल ग्राऊंडच्या मागील भागापासून ते लॉन टेनिस कोर्टपर्यंत सिमेंट रस्ता, आजूबाजूला हायमास लाईट व प्रवेशद्वार उभारले जाणार आहे. आकाशवाणीच्या उजव्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेचा अधिकृतपणे ताबा घेऊन तिथे आर्चरी, हॉकी, शुटिंग, अ‍ॅथेलेटिक्समधील थ्रोविंग इव्हेंट व इतर क्रीडांगणे तयार केली जाणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.