लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : काश्मीरातील दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. यवतमाळ जिल्ह्यातही या हल्ल्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिकांनी पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा, राष्ट्रध्वज जाळून, मोर्चे-आंदोलने करून निषेध नोंदविला.हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी भारतबंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात सर्वच पक्षाच्या कार्यकर्ते व नागरिकांनी सहभाग नोंदविला. उमरखेडपासून वणीपर्यंत बंदला कुठे शंभर टक्के तर कुठे संमिश्र प्रतिसाद मिळाला. यवतमाळ शहरात बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. १० ते १५ युवकांचा जथ्था बाजारपेठ बंद ठेवण्यासाठी शहरात फिरुन व्यापारी-व्यावसायिकांना आवाहन करीत होता. सायंकाळी बसस्थानक चौकात पाकिस्तानचा पुतळा जाळण्यात आला. अनेक ठिकाणी श्रद्धांजली, देशभक्तीपर गीत गायन, कॅन्डल मार्च, प्रशासनाला निवेदने आदी कार्यक्रम पार पडले. सायंकाळी भारत बँड पथक आणि शनिमंदिर चौक मित्र परिवाराच्या वतीने वाद्य संगीताच्या माध्यमातून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. स्थानिक स्टेट बँक चौक, नेहरूनगर, गांधीनगर स्कूलच्या परिसरात शहिदांना कँडल लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.निषेध आणि श्रद्धांजलीकाश्मीरातील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाभर ठिकठिकाणी निषेध करून श्रद्धांजली वाहण्यात आली. पांढरकवडा येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयातही श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्हाभर पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा व राष्टÑध्वज जाळून निषेध नोंदविला गेला.
जिल्हाभर बंद, पुतळे जाळले, मोर्चे, निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 10:15 PM
काश्मीरातील दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. यवतमाळ जिल्ह्यातही या हल्ल्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिकांनी पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा, राष्ट्रध्वज जाळून, मोर्चे-आंदोलने करून निषेध नोंदविला.
ठळक मुद्देदहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध : यवतमाळातील बाजारपेठ बंद, ग्रामीण भागातही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद