लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार व सहायक पोलीस निरीक्षक विजय रत्नपारखी यांनी २०१४-१५ मध्ये गडचिरोली येथे नक्षलवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई केली. त्यांच्या या कामगिरीबद्दल दोघांना शौर्य पदक बहाल करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोलीत काम केलेल्या एम. राज कुमार यांना २०१७ व २०१८ या सलग दोन वर्षात शौर्य पदक जाहीर झाले.शौर्य पदक प्राप्त अधिकाऱ्यांना मुंबई येथील राज्य पोलीस मुख्यालयात पदक प्रदान केले जाणार आहे. त्यासाठी गुरुवारी २५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अलंकरण समारोह आयोजित केला आहे. हे पदक राज्यपाल महोदयांच्या हस्ते दिले जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात काम करताना १४ जून २०१४ रोजी मंडोली जंगलात नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला साहसाने परतून लावला. मोठी जीवित हानी टाळली.याकरिता त्यांना २०१७ मध्ये भारत सरकारने पोलीस शौर्य पदक जाहीर केले होते. त्यानंतर ३ सप्टेंबर २०१५ रोजी चिंचोडा जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला परतून लावला. या कामगिरीसाठी २०१८ मध्ये भारत सरकारने शौर्य पदक जाहीर केले.या दोन्ही पदकांचे वितरण मुंबईत केले जाणार आहे. तसेच सध्या पुसद शहर पोलीस ठाण्यात सहायक निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या विजय रमेशराव रत्नपारखी यांना शौर्य पदक जाहीर झाले आहे. त्यांनीसुद्धा १३ जून २०१४ रोजी गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून नक्षल साहित्य जप्त केले होते. या कामगिरीबद्दल रत्नपारखी यांना १५ आॅगस्ट २०१७ रोजी शौर्य पदक जाहीर झाले. रत्नपारखी यांनासुद्धा राज्यपालांच्या हस्ते मुंबईतील कार्यक्रमात हे पदक दिले जाणारआहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राज कुमार यांना दोन शौर्य पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 9:59 PM
येथील जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार व सहायक पोलीस निरीक्षक विजय रत्नपारखी यांनी २०१४-१५ मध्ये गडचिरोली येथे नक्षलवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई केली. त्यांच्या या कामगिरीबद्दल दोघांना शौर्य पदक बहाल करण्यात आले.
ठळक मुद्देमुंबईत वितरण : आज राज्यपालांच्या हस्ते होणार गौरव