शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

खर्रा विक्रेत्यांविरूद्ध पोलिसांची जिल्हाभर मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 5:00 AM

भोसा रोड, पवारपुरा, इंदिरानगर व अन्य भागात कोरोनाचा उद्रेक झाला. हापसीवरील गर्दी, पाण्याच्या प्रतीक्षेत झाडाखाली होणारी गर्दी ही प्रमुख कारणे त्यासाठी जबाबदार ठरली. मात्र यासोबत खर्रा हेसुद्धा एक कारण चर्चिले गेले. परंतु प्रत्यक्षात याबाबत कोणताही सबळ पुरावा अथवा आधार मिळालेला नाही. आतापर्यंतच्या रुग्णात केवळ एकाला याची बाधा झाल्याचे आढळून आले.

ठळक मुद्देकळंब, यवतमाळात कारवाई : कोरोना संसर्गाची केवळ चर्चा, आधार मात्र नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खर्रा खाणाऱ्यांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला याची चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात त्याबाबत कोणताच आधार नाही. आतापर्यंतच्या तपासणीत खर्ऱ्यामुळे संसर्ग झाल्याचा केवळ एक रुग्ण आढळून आला. मात्र या खर्ऱ्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावल्याने पोलिसांनी आता जिल्हाभर खर्रा विक्रेत्यांविरूद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. बुधवारी अनेक ठिकाणी कारवाईही करण्यात आली.भोसा रोड, पवारपुरा, इंदिरानगर व अन्य भागात कोरोनाचा उद्रेक झाला. हापसीवरील गर्दी, पाण्याच्या प्रतीक्षेत झाडाखाली होणारी गर्दी ही प्रमुख कारणे त्यासाठी जबाबदार ठरली. मात्र यासोबत खर्रा हेसुद्धा एक कारण चर्चिले गेले. परंतु प्रत्यक्षात याबाबत कोणताही सबळ पुरावा अथवा आधार मिळालेला नाही. आतापर्यंतच्या रुग्णात केवळ एकाला याची बाधा झाल्याचे आढळून आले. तरीही खर्रा विक्रेते व खाणाऱ्यांमुळे पोलीस दलाकडे साशंकतेने पाहिले जात असल्याने पोलिसांनी या विक्रेत्यांविरूद्धच धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्हाभर खर्रा विक्रेते व साठेबाजांविरूद्ध गुन्हे दाखल केले जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेची पथके खर्रा विक्रेत्यांवर वॉच ठेऊन आहे. ठिकठिकाणी माल जप्त केले जात आहे. बुधवारी जयभारत चौकातील विजय उर्फ टायसन रामदास सलाम (४४) हा घरून खर्रा विकत असल्याची गोपनीय माहिती सहायक फौजदार साहेबराव राठोड यांना मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून सलाम याच्या घरावर धाड टाकली. त्याच्या घरून खर्रा बनविण्यासाठी लागणारी सुपारी, तंबाखू व इतर साहित्याचा साठा जप्त केला. त्याच्याविरूद्ध भादंवि कलम २६९, २७०, सहकलम ५१ व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार गुन्हा दाखल केला.ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर, सुधीर पिदुरकर, गजानंद हरणे, हरिश राऊत यांनी केली. चोरून खर्रा विकणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.कळंबमध्ये ३५ हजारांचा खर्रा जप्तकळंब : शहरातील काही भागात बनावट सुगंधी तंबाखू व सुपारी वापरून खर्रा विक्री सुरू होती. तपेश्वरी वॉर्डातील या अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी ३५ हजारांचा खर्रा जप्त केला. महंमद शकील महंमद खलील (५३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फोनवरूनच तो खºर्याची डिलिवरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कळंब शहरात बनावट सुगंधी तंबाखूची विक्रीही जोरात सुरू आहे. या तंबाखूमध्ये प्राणघातक घटकांचा वापर केला जातो. येथील मध्यवर्ती बँक रोडवरील टॉवरजवळच्या एका घरातून ही विक्री सुरू आहे. काही दिवसांपूर्वी येथे ४०७ मेटॅडोरने लाखो रुपयांचा माल उतरविण्यात आला. येथे आलेल्या सर्व मालाची पप्पूकडून विल्हेवाट लावण्यात आली. विशेष म्हणजे, येथून हाकेच्या अंतरावरच पोलीस ठाणे आहे तरीही या पप्पूला पोलिसांची भीती नाही. कारवाई केवळ किरकोळ विक्रेत्यांवर होते. मोठ्यांना परस्पर सूट मिळत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTobacco Banतंबाखू बंदी