शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९१.८५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 5:00 AM

जिल्ह्यात ११२ परीक्षा केंद्रावरून ३१ हजार ६०० विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी २९ हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे २०६५ विद्यार्थ्यांनी यंदा विशेष प्राविण्य श्रेणी मिळविली आहे. तर १२ हजार ६९५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकाविली आहे. याशिवाय १३ हजार ६९७ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणीवर समाधान मानावे लागले. मात्र जिल्ह्यातील ७६८ विद्यार्थी तृतीय श्रेणीत म्हणजे एका अर्थाने काठावर उत्तीर्ण झाले.

ठळक मुद्देयंदाही मुलींचीच बाजी : मागील वर्षीपेक्षा जिल्ह्याचा निकाल पाच टक्क्यांनी वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शिक्षण मंडळाने गुरुवारी जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात जिल्ह्यातील २९ हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी वाढली असून ९१.८५ टक्के निकाल लागला आहे. गेल्या वर्षीच्या ८६ टक्क्यांवरून यंदा पाच टक्क्यांनी निकाल वाढला. मागच्या वेळी विभागात ढांग असलेला जिल्हा यंदा तिसऱ्या स्थानावर गेला. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.२२ तर मुलांची ८९.७९ टक्के एवढी आहे.जिल्ह्यात ११२ परीक्षा केंद्रावरून ३१ हजार ६०० विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी २९ हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे २०६५ विद्यार्थ्यांनी यंदा विशेष प्राविण्य श्रेणी मिळविली आहे. तर १२ हजार ६९५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकाविली आहे. याशिवाय १३ हजार ६९७ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणीवर समाधान मानावे लागले. मात्र जिल्ह्यातील ७६८ विद्यार्थी तृतीय श्रेणीत म्हणजे एका अर्थाने काठावर उत्तीर्ण झाले. गंभीर म्हणजे यंदा निकालाची टक्केवारी वाढलेली असतानाही जिल्ह्यातील दोन हजार ५७५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे शिक्षण विभागावर आत्मचिंतनाची वेळ आली.दरम्यान बारावीच्या निकालात विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही शाखांमध्ये मुलींनीच अव्वल स्थान मिळविले आहे. जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलची श्रेया बाजोरिया (९५.३८) ही विज्ञान शाखेतून तसेच जिल्ह्यात अव्वल ठरली. अणे महिला महाविद्यालयाची कुंजन विजय तोदी (९४.७७) ही विद्यार्थिनी वाणिज्य शाखेतून पहिली तर जेडीईएमएसची साक्षी हरीश जाधवाणी (९४.१५) दुसरी ठरली. अभ्यंकर कन्या शाळेची प्रगती सुखदेव भरणे (८९.३८) ही विद्यार्थिनी कला शाखेतून अव्वल ठरली आहे.बारावीच्या निकालात विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींनी यावर्षीही बाजी मारली आहे. यंदा जिल्ह्यातून १६ हजार ९०२ विद्यार्थी तर १४ हजार ६९८ विद्यार्थिनींनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यात १५ हजार ११७ विद्यार्थी तर १३ हजार ८४९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण होणाºया मुलांचा एकूण आकडा मुलींपेक्षा दीड हजारांनी अधिक दिसत असला तरी परीक्षेला बसणाºया मुलांचा आकडाही त्याच प्रमाणात जास्त आहे.जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलची श्रेया बाजोरिया जिल्ह्यात टॉपर, ‘सीए’ होण्याचे स्वप्नबारावीच्या परीक्षेत ९५.३८ टक्के गुणांसह जिल्ह्यात टॉपर राहिलेली श्रेया संजय बाजोरिया ही येथील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे. ती दहावीच्या परीक्षेत यवतमाळ पब्लिक स्कूलमधून ९७ टक्के गुण घेत जिल्ह्यात तिसरी आली होती. मूळ दारव्हा तालुक्यातील बोरीअरबची रहिवासी व सध्या बालाजी चौकात वास्तव्याला असलेल्या श्रेयाने आपल्याला सीए व्हायचे असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. दररोज आठ तास अभ्यास केल्यामुळे परीक्षेचा ताण वाटला नाही. गणित व जीवशास्त्रात प्रत्येकी ९८ गुण प्राप्त केले. तीन भावांचे एकत्र कुटुंब हे आपले बलस्थान असल्याचे श्रेयाने सांगितले. तिचा भाऊ योगेशही ९२ टक्के गुणांनी पास झाला होता. वडील संजय हे बीई आणि आई अल्का एमकॉम आहे.दोन हजार विद्यार्थ्यांना मिळाली प्राविण्य श्रेणी२०६५ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी मिळविली आहे. यावरून विद्यार्थ्यांच्या एकंदर यशातील मोठा असमतोल स्पष्ट झाला. कला शाखेत सर्वाधिक ५८७० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळविली आहे. त्या खालोखाल विज्ञान शाखेतील ५३३७, वाणिज्य १०९६ तर व्होकेशनलचे ३९२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले.अ‍ॅग्लो हिंदीच्या अजयचे गवंडी काम करून यशअँग्लो हिंदी हायस्कूलचा विद्यार्थी अजय पांडुरंग राठोड हा गवंडी काम करून ८५ टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण झाला. त्याचे आई-वडीलही गवंडी काम करतात. अजयचा मोठा भाऊ संदेश हासुद्धा याच वर्षी बारावीत अ‍ॅग्लो हिंदीचा विद्यार्थी असून कॉमर्समध्ये ८६.१५ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला आहे. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल