शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

जिल्ह्याचा रॉकेल कोटा २० लाख लिटरने घटला

By admin | Published: May 30, 2016 12:02 AM

जिल्ह्याच्या रॉकेल नियतनात तब्बल दोन हजार केएल म्हणजे २० लाख लिटर रॉकेलची कपात झाली असून जिल्ह्यात वाढलेल्या दोन लाख सिलिंडर ग्राहकांमुळे ही कपात करण्यात आली.

परिपत्रकाने फेरबदल : दोन लाख सिलिंडर वाढीने कपातरूपेश उत्तरवार यवतमाळ जिल्ह्याच्या रॉकेल नियतनात तब्बल दोन हजार केएल म्हणजे २० लाख लिटर रॉकेलची कपात झाली असून जिल्ह्यात वाढलेल्या दोन लाख सिलिंडर ग्राहकांमुळे ही कपात करण्यात आली. पूर्वी जिल्ह्याला ३२०० केएल रॉकेल मिळत होते. आता जिल्ह्याच्या वाट्याला ११२४ केएल म्हणजे ११ लाख २४ हजार लिटर रॉकेल मिळत आहे. यामुळे रॉकेलच्या काळ्याबाजाराला आळा बसण्यास मदत होणार आहे. रात्रीच्या वेळी अंधाऱ्या झोपडीला प्रकाशमान करणारा दिवा काळाच्या पडद्याआड होण्याची चिन्ह आहेत. पूर्वी इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या रॉकेलचा वापर काळानुसार कमी झाला. मात्र यानंतरही रॉकेलची उचल कायम होती. दिवाबत्तीच्या नावावर येणारे रॉकेल चोरून खासगी वाहनासाठी विकले जात होते. राज्यातील रॉकेल घोटाळयातून हा प्रकार उघड झाला. यामुळे अनुदानावर उपलब्ध होणारे केरोसीन काळाबाजारातून बाहेर काढण्यासाठी राज्याने पाऊल उचलले आहे. एक अथवा दोन सिलिंडर असणाऱ्या ग्राहकाच्या कुटुंबाला केरोसीन न देण्याचा निर्णय घेतला. तसे परिपत्रकच निघाले. गत पाच वर्षात रॉकेल वापरात झालेली घट आणि शासनाच्या परिपत्रकानुसार केलेली कपात यातून जिल्ह्याचा कोटा दोन हजार केएलने घटला आहे. गॅस सिलिंडरसारखे इंधनाचे पर्यायी साधन आल्यानंतरही रॉकेलची उचल विक्रेत्यांनी कमी केली नाही. हे रॉकेल काही विक्रेत्यांमार्फत मोठ्या प्रमाणात काळ्याबाजारात जात असल्याचा पुरवठा विभागाला संशय होता. रॉकेल घोटाळयाने काळ्याबाजारावर शिक्कामोर्तब केले. यावर अंकुश बसविण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने सिलिंडर असणाऱ्या ग्राहकांचा रॉकेल कोटा थांबविण्याच्या सूचना दिल्या.त्यानुसार जिल्ह्यातील ग्राहकांची यादी पुरवठा विभागाने तयार केली. एक आणि दोन सिलिंडर असणाऱ्या ग्राहकाकडील रॉकेल बंद करण्यात आले. यातून दर महिन्याला रॉकेलमध्ये कपात नोंदविण्यात आली आहे. आता तर किरकोळ ग्राहकाकडे शिल्लक असणारे रॉकेल समर्पित करण्यात येत आहे. गत तीन महिन्यांत एक लाख ३२ हजार लिटर रॉकेल समर्पित करण्यात आले.सिलिंडर नसलेल्या ग्राहकांसाठी सध्याच्या शासकीय निकषानुसार एका व्यक्तीला २ लिटर, दोन व्यक्तीला ३ लिटर, तीन व्यक्तीला चार लिटर रॉकेल देण्याचा नियम आहे. त्याकरिता प्रत्येक तालुक्यात रॉकेलचा दर निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्यात वाहन खर्चानुसार वेगवेगळा दर निश्चित आहे. १६ रूपयांपासून १७ रूपयापर्यंतचा दर आहे.२०१२ मध्ये जिल्ह्याला ३२०० केएल रॉकेलचा पुरवठा होत होता. तर जिल्ह्यात दोन लाख सिलिंडरची नोंद झाल्याने दोन हजार केएलने कमी झाला आहे. मे महिन्यात ११६४ केएल रॉकेल जिल्ह्यात नागरिकांसाठी वितरणाकरिता आले आहे. यामध्ये ४८ केएल रॉकेल शिल्लक असल्याने समर्पित करण्यात आले आहे.रॉकेल वाटपासाठी ‘आधार’गॅसपाठोपाठ रॉकेल ग्राहकांना पूर्ण किमतीत देण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामध्ये केरोसीनचे अनुदान थेट ग्राहकाच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे केरोसीनचा गैरवापर टळणार आहे. याकरिता रॉकेलचे कार्ड आधार कार्डला जोडण्यात येत आहेत.वाहनात जाणाऱ्या रॉकेलला बे्रकजिल्ह्यातील रॉकेलचा साठा दोन हजार केएलने घटला आहे. पूर्वी हे रॉकेल मोठ्या प्रमाणात अवैध वाहनामध्ये वापरले जात होते. नवीन नियमामुळे रॉकेलमध्ये कपात झाली आहे. यामुळे अवैध वाहनात जाणाऱ्या रॉकेलला ब्रेक लागला आहे. सिलिंडरअभावी आदिवासी बांधवांपुढे पेच वन व्यवस्थापनासोेबत जलतनावर अंकुश लावण्यासाठी वन विभागाने आदिवासी बांधवांना गॅस सिलिंडर पुरविले आहेत. मात्र त्यांनी हे गॅस सिलिंडर परस्पर दुसऱ्यांना सुपूर्द केले. अशा स्थितीत शासनाच्या आदेशाने या कुटुंबाचे रॉकेल बंद करण्यात आले आहे. यामुळे या ग्राहकांपुढे जलतनासोबत दिवाबत्तीचा पेच निर्माण झाला आहे. शासनाच्या नियमानुसार सिलिंडरधारक ग्राहकांचा रॉकेल कोटा बंद करण्यात आला. त्यामुळे रॉकेलमध्ये कपात झाली. सोबतच उरलेले रॉकेलही समर्पित करीत आहे. यामुळे अवैध रॉकेल विक्रीला आळा बसेल. - शालिग्राम भराडी जिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ