लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य निवडणूक आयोगाकडून दिव्यांगांची मतदार म्हणून स्वतंत्र नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहे. यासाठी तहसील स्तरावरील निवडणूक विभागाकडून नोंदणी प्रक्रिया राबविली जात आहे. कार्यालयीन वेळेत नोंदणी केली जाणार आहे.मतदान प्रक्रियेत दिव्यांगांना आपला हक्क बजावताना अडचणी येतात. त्यासाठी केंद्रनिहाय नियोजन केले जाणार आहे. दिव्यांग मतदारांचा नेमका आकडा किती, कोणत्या केंद्रावर किती मतदार याची नोंद स्वतंत्रपणे घेतली जात आहे. त्यासाठी निवडणूक विभागाची यंत्रणा कामी लागली आहे. दिव्यांग व्यक्तींना मतदान कराताना सोईचे व्हावे, त्यांना कोणतही अडचण येवू नये यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. त्याचा एक भाग म्हणून दिव्यांग व्यक्तींची मतदार यादीत स्वतंत्र नोंद घेतली जाणार आहे.जिल्ह्यात २० लाख ७५ हजार ५३६ मतदार आहेत. त्यामध्ये दहा लाख ८१ हजार ५२४ पुरुष तर नऊ लाख ९३ हजार ८८२ महिला मतदार आहे. इतर मतदारांमध्ये तृतीयपंथीयांची नोंद असून हा आकडा ३० इतका आहे. जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात संभाव्य मतदान केंद्राचे नियोजन केले जात असून आज दोन हजार ३१० मतदान केंद्र आहे. हा आकडा दोन हजार ६०३ इतका होण्याचे संकेत आहे.यासाठी चार हजार ६८५ बॅलेट युनिट आणि तीन हजार २५३ कंट्रोल युनिट आणि तेवढ्याच व्हीव्हीपॅट यंत्रांची गरज आहे. यासंदर्भातील अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. संभाव्य लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून जुळवाजुळव सुरू आहे. यासाठी यंत्रणेकडूनच आढावा घेतला जात आहे. जुन्या वापरातील मतपेट्या दक्षिणेकडील राज्यांना दिल्या आहे. तेथे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक बॅलेट पेपरवरच होत असल्याने मतपेट्या तेथे देण्यात आल्या. यामुळे रिक्त जागेवर ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहे. यापेक्षाही मोठी जागा व यंत्रणेची गरज निवडणूक विभागाला आहे. दिव्यांग व्यक्तींची नावे मतदार यादीत समाविष्ठ करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली असून दिव्यांग व्यक्तींनी आपली नावे मतदार यादीत नोंदविण्याचे आवाहन केले आहे.ईव्हीएम ठेवण्यासाठी अपुरी जागासध्या जिल्हा निवडणूक विभागाकडे असलेले ईव्हीएम मशीन ठेवण्यास पुरेशी जागा उपलब्ध नाही. पाच कोटींचा स्वतंत्र गोदाम बांधण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर असल्याने त्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सध्या तरी मशीन ठेवण्याचा प्रश्न प्रशासनापुढे आहे. यातच व्हीव्हीपॅटचा प्रयोग केला जाणार असल्याने आणखी प्रशस्त जागा लागणार आहे.
दिव्यांग मतदारांची होणार स्वतंत्र नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:33 PM
राज्य निवडणूक आयोगाकडून दिव्यांगांची मतदार म्हणून स्वतंत्र नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहे. यासाठी तहसील स्तरावरील निवडणूक विभागाकडून नोंदणी प्रक्रिया राबविली जात आहे. कार्यालयीन वेळेत नोंदणी केली जाणार आहे.
ठळक मुद्देआयोगाचे निर्देश : तहसील कार्यालयात करता येणार नोंदणी